30 C
Mumbai
Saturday, February 7, 2026
घरराजकारणआमदार अतुल भातखळकर यांच्यावर गुन्हा

आमदार अतुल भातखळकर यांच्यावर गुन्हा

Google News Follow

Related

भाजपाचे नेते आणि आमदार अतुल भातखळकर यांच्यावर समतानगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आकुर्ली येथे झालेल्या मेट्रो ट्रायल रनच्या उद्घाटनप्रसंगी मुख्यमंत्र्यांचा निषेध करण्यासाठी भातखळकर यांच्या नेतृत्वाखाली भाजपाने तीव्र आंदोलन केले होते. त्याप्रकरणी आठ जणांना अटक करण्यात आली असून त्यात भातखळकर यांनाही आरोपी करण्यात आले आहे.

मुंबईतील मेट्रोच्या २ ए आणि ७ या दोन मार्गिकांचे उद्घाटन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते झाले. त्यावेळी भातखळकर यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या आंदोलनात मुख्यमंत्र्यांना काळे झेंडे दाखविण्यात आले. ज्यांनी मेट्रोचा बट्याबोळ केला त्यांना या उद्घाटनाचा अधिकार काय, असा सवाल भातखळकरांनी विचारला.

हे ही वाचा:

महेश जेठमलानींना राज्यसभा खासदारकीसाठी उमेदवारी

दहावीच्या विद्यार्थ्यांच्या मूल्यांकनासाठी शाळांना हवाय वेळ

चीनमध्ये आता अपत्ये तीन, लेकुरे उदंड होणार

सलून, व्यायामशाळा, उद्यानांना मुहूर्त नाहीच

अहंकार आणि बालहट्टापायी लाखो मुंबईकरांचे स्वप्न असलेल्या मुंबई मेट्रोचा बट्याबोळ करून फुकटचे श्रेय घेण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे धडपडत असल्याचा घणाघाती आरोप करत त्यांच्याविरुद्ध आमदार अतुल भातखळकर यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन करण्यात आले होते. त्यावेळी आमदार भातखळकर आणि भाजपा कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले होते. मुख्यमंत्र्यांच्या या चमकोगिरीचा निषेध आंदोलनात करण्यात आला.

त्यावेळी बोलताना भातखळकर म्हणाले की, मुख्यमंत्री कोणत्या अधिकाराने चमकोगिरी करत आहेत. हा प्रकल्प रखडवल्याबद्दल खरे तर त्यांनी मुंबईकरांची माफी मागायला हवी. पण ते कोरोनाच्या काळात न केलेल्या कामाची जाहिरातबाजी करत आहेत. मेट्रोच्या कामाचा मुख्यमंत्र्यांनी खेळखंडोबा केला आहे, त्यामुळे त्यांना या ट्रायल रनचे उद्घाटन कऱण्याचा नैतिक अधिकार नाही.

National Stock Exchange
spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

News Danka Samarpan Parv
Star Housing Finance Limited

आम्हाला follow करा

113,459चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
290,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा