31 C
Mumbai
Thursday, December 11, 2025
घरराजकारण‘तांडव’ च्या बचावाला ठाकरे सरकार!

‘तांडव’ च्या बचावाला ठाकरे सरकार!

Google News Follow

Related

‘तांडव’ वेब सिरीज विरोधात घाटकोपर पोलिस स्थानकात एफआयआर दाखल करण्यात आला आहे. घाटकोपरचे भाजपा आमदार राम कदम यांच्या तक्रारीनंतर ही एफआयआर दाखल झाला आहे. तांडवच्या बचावाला ठाकरे सरकार धावून आल्याचा खळबळजनक दावा आमदार राम कदम यांनी केला आहे.

हे ही पहा:https://www.newsdanka.com/politics/ministry-of-information-and-broadcasting-seeks-explaination/3462/

१५ जानेवारी रोजी ‘तांडव’ ही वेब सिरीज ॲमेझोन प्राईमवर प्रदर्शित झाली. प्रदर्शित झाल्यापासूनच ही सिरीज वादाच्या भोवऱ्यात अडकली होती. या सिरीजमधील धार्मिक आणि जातीय भावना दुखावणाऱ्या दृष्य आणि संवादावरून तांडव विरोधात देशभर वातावरण तापले असतानाच महाराष्ट्रात आता या वेब सिरीज विरोधात एफआयआर दाखल झाला आहे. घाटकोपर पोलिसांनी राम कदम यांच्या तक्रारीनंतर कायदेशीर सल्ला घेऊन अखेरीस हा एफआयआर दाखल केला आहे. भारतीय दंड विधानाच्या १५३(अ), २९५(अ) आणि ५०५(२) या कलमांचा उल्लेख या एफआयाआर मध्ये करण्यात आला आहे.

ठाकरे सरकार वर हल्लाबोल
तांडव’ विरोधात एफआयआर दाखल झाला असला तरी यावारून आमदार राम कदम यांनी ठाकरे सरकार वर निशाणा साधला आहे. “आम्ही ‘तांडव’ विरोधात तक्रार करून एफआयआर दाखल करायची मागणी केली होती. पण ठाकरे सरकारने ह एफआयआर होऊ दिला नाही.” असा आरोप कदम यांनी केला आहे. ॲमेझोन कंपनीतील आणि चित्रपट सृष्टीतील काही बड्या लोकांना वाचवण्यासाठी ठाकरे सरकार प्रयत्नशील असल्याचा दावा राम कदम यांनी केला आहे. 

National Stock Exchange
spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

News Danka Samarpan Parv
Star Housing Finance Limited

आम्हाला follow करा

113,459चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
284,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा