30 C
Mumbai
Sunday, March 29, 2026
घरक्राईमनामाशरद पवारांविषयीची पोस्ट केतकी चितळेला भोवणार; गुन्हा दाखल

शरद पवारांविषयीची पोस्ट केतकी चितळेला भोवणार; गुन्हा दाखल

Google News Follow

Related

मराठी अभिनेत्री केतकी चितळे ही तिच्या सोशल मीडियावर बेधडकपणे केलेल्या वक्तव्यांमुळे सतत चर्चेत असते. केतकी चितळे हिने तिच्या फेसबुकवर पोस्ट शेअर केल्यामुळे पुन्हा वादाच्या भोवऱ्यात सापडली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्याबद्दलची एक पोस्ट केतकी हिने शेअर केली असून या पोस्टनंतर तिला ट्रोल करण्यात येत आहे. केतकी चितळे विरोधात कळव्यात गुन्हा देखील दाखल झाला आहे.

केतकी चितळे ही सोशल मीडियावर बेधडकपणे केलेल्या वक्तव्यांमुळे यापूर्वीही अनेकदा अडचणीत सापडली आहे. वकील नितीन भावे नावाच्या व्यक्तीने लिहिलेली पोस्ट केतकी चितळेने शेअर केली असून यात कवितेच्या स्वरूपातून शरद पवार यांच्यावर टीका करण्यात आली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्याबद्दल आक्षेपार्ह पोस्ट शेअर केल्यामुळे पक्षातील नेते, कार्यकर्ते आणि लोकांमध्ये तीव्र नाराजी आहे. त्यामुळे कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ शकतो, असे राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी स्वप्निल नेटके यांनी म्हटले आहे. तसेच केतकीने ही पोस्ट करुन दोन राजकीय पक्षांमध्ये द्वेषाची भावना, तेढ निर्माण करण्याचे कृत्य केले आहे, असेही ते म्हणाले.

हे ही वाचा:

… आणि चंद्राच्या मातीत फुलली बाग

दिल्लीत इमारतीला भीषण आग; २७ जणांचा मृत्यू

यूएईचे अध्यक्ष शेख खलिफांचे निधन

मलिकांना जामीन नाहीच; पण खासगी रुग्णालयात उपचारांची परवानगी

शरद पवार यांना उद्देशून बदनामीकारक, मानहानीकारक पोस्ट केतकीने केली असल्याची तक्रार स्वप्नील नेटके यांनी कळवा पोलिस ठाण्यात केली आहे. कळवा पोलिस ठाण्यात कलम ५००, ५०५(२), ५०१ आणि १५३ (अ) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान, केतकीला अटक होण्याची देखील शक्यता वर्तवण्यात येत आहे.

National Stock Exchange
spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

News Danka Samarpan Parv
Star Housing Finance Limited

आम्हाला follow करा

113,459चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
300,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा