30 C
Mumbai
Thursday, April 2, 2026
घरक्राईमनामा'त्या' ऑडिओ क्लिपनंतर संजय राऊतांवर गुन्हा दाखल

‘त्या’ ऑडिओ क्लिपनंतर संजय राऊतांवर गुन्हा दाखल

Google News Follow

Related

शिवसेना खासदार संजय राऊत यांच्या अडचणीत वाढ झाली आहे. संजय राऊत यांच्या विरोधात मुंबईतील वाकोला पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. एका महिलेला शिवीगाळ केल्याप्रकरणी संजय राऊत यांच्या विरोधात थेट पोलीस ठाण्यात तक्रार दाखल झाली आहे. या प्रकरणात संजय राऊत यांना चौकशीसाठी बोलावलं जाण्याची शक्यता आहे.

संजय राऊत यांची आणि एका महिलेची ऑडिओ क्लिप व्हायरल झाली होती. या आधारे पोलिसांनी संजय राऊत यांच्या विरोधात भारतीय कलम ५०७ अंतर्गत संजय राऊत यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

संजय राऊत आणि एका महिलेची ऑडिओ क्लिप व्हायरल झाली असून यामध्ये संजय राऊत हे एका महिलेशी बोलत असताना आक्षेपार्ह भाषेत बोलताना ऐकू येत आहे. यावेळी या क्लिपच्या शेवटी राऊत यांनी महिलेला जमिनीची कागदपत्रे देण्यास सांगितले असून त्यांनी आक्षेपार्ह भाषा वापरली आहे.

हे ही वाचा:

मुख्यमंत्र्यांच्या सत्यनारायण पूजेचा वाद न्यायालयात

संजय राऊतांची शिवीगाळ करत असतानाची ऑडियो क्लिप व्हायरल

आजपासून दिल्ली- देवघर विमान सेवा सुरु

काँग्रेस-राष्ट्रवादीच्या मांडीला मांडी लावून सत्तेची मलई ओरपलीत तेव्हा कुठे होता मराठी बाणा?

ही ऑडिओ क्लिप समोर आल्यानंतर संजय राऊत यांच्यावर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली होती. यापूर्वीही अनेकदा संजय राऊत यांनी माध्यमांसमोर आक्षेपार्ह भाषेचा वापर केला होता त्यावरून संजय राऊत यांच्यावर टीका करण्यात आली होती.

National Stock Exchange
spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

News Danka Samarpan Parv
Star Housing Finance Limited

आम्हाला follow करा

113,459चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
301,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा