21 C
Mumbai
Saturday, January 24, 2026
घरक्राईमनामाअल फलाह विद्यापीठाचे संस्थापक जवाद सिद्दीकी यांना अटक

अल फलाह विद्यापीठाचे संस्थापक जवाद सिद्दीकी यांना अटक

दिल्ली स्फोट प्रकरणात ईडीने केली होती छापेमारी

Google News Follow

Related

अंमलबजावणी संचालनालय (ED) यांनी मंगळवारी अल-फलाह युनिव्हर्सिटीचे संस्थापक आणि अल-फलाह ग्रुपचे चेअरमन जवाद अहमद सिद्दीकी यांना मनी लॉन्डरिंग प्रकरणात अटक केली. या प्रकरणात दहशतवादाला आर्थिक मदत झाली का, याचाही तपास सुरु आहे, असे अधिकाऱ्यांनी सांगितले.

ही कारवाई फरीदाबादस्थित या विद्यापीठावर वाढलेल्या तपासाच्या पार्श्वभूमीवर करण्यात आली आहे. तपास यंत्रणांच्या मते, हे विद्यापीठ १० नोव्हेंबरला लाल किल्ल्याजवळ झालेल्या स्फोटात  गुंतलेल्या ‘व्हाईट कॉलर’ दहशतवादी मॉड्यूलचे केंद्रस्थान बनले होते.

पुराव्यांचा तपशीलवार अभ्यास

ईडी अधिकाऱ्यांनी सांगितले की विद्यापीठ आणि अल-फलाह ग्रुपशी संबंधित इतर ठिकाणी घेतलेल्या झडतीदरम्यान मिळालेल्या पुराव्यांच्या तपासानंतर ही अटक करण्यात आली.

सूत्रांच्या माहितीनुसार, दिल्ली पोलिसांच्या क्राईम ब्रँचनं दाखल केलेल्या दोन एफआयआरच्या आधारे ईडीचा तपास सुरु झाला. या एफआयआरमध्ये आरोप होता की, अल-फलाह युनिव्हर्सिटीने बनावट NAAC मान्यता दाखवली आणि स्वतःला चुकीच्या पद्धतीने UGC कायद्याच्या 12(B) कलमानुसार पात्र असल्याचे सांगितले.

UGC ने नंतर स्पष्ट केले की हे विद्यापीठ फक्त 2(f) अंतर्गत नोंदणीकृत आहे आणि कधीही 12(B) च्या अनुदानासाठी पात्र राहिलेले नाही.

हे ही वाचा:

दोन गटांत फुटलेली काँग्रेस राहुल गांधींना वाचवण्यात गुंतली

आर. माधवनचा काय आहे लुक टेस्टचा किस्सा ?

मुलींनी माहेरात किती दिवस-तास राहावं?

लिंकनचा गेटिसबर्ग चमत्कार!

ट्रस्टची रचना आणि पैशांचा मागोवा

अल-फलाह चॅरिटेबल ट्रस्टची स्थापना १९९५ मध्ये झाली. सिद्दीकी हे त्याचे संस्थापक आणि व्यवस्थापकीय विश्वस्त आहेत. हाच ट्रस्ट अल-फलाह ग्रुपमधील सर्व शैक्षणिक संस्थांचा मालक आहे आणि त्यांचे आर्थिक व्यवहार एकत्र करतो.

तपासकर्त्यांच्या मते, १९९० नंतर संस्थांमध्ये झपाट्याने वाढ झाली, परंतु त्याला पुरेशा आर्थिक कागदपत्रांचा आधार नव्हता.

झडतीदरम्यान उघड झाले की, कोट्यवधी रुपयांचा गैरव्यवहार झाला असून पैसे कौटुंबिक कंपन्यांकडे वळवले गेले. बांधकाम आणि केटरिंगचे कंत्राटे सिद्दीकी यांच्या पत्‍नी व मुलांशी संबंधित फर्मना दिलेले आढळले

४८ लाख रोख जप्त, शेल कंपन्या उघड

ईडीने ४८ लाख रोख, डिजिटल उपकरणे आणि मोठ्या प्रमाणावर कागदपत्रे जप्त केली. तसेच अल-फलाह ग्रुपशी जोडलेल्या शेल कंपन्याही आढळल्या.

पुराव्यानुसार, ट्रस्टच्या पैसे वळवणे, लेयरिंग आणि गैरवापर स्पष्ट दिसून येतो. या सर्व निर्णयांमध्ये सिद्दीकी यांचा थेट हस्तक्षेप होता, असे ईडीचे म्हणणे आहे.

दहशतवादी वित्तपुरवठ्याचा संशय

तपासात हेही पाहिले जात आहे की या गैरव्यवहारातील काही पैसे १० नोव्हेंबर लाल किल्ला स्फोटातील आरोपींना दिले गेले का? ही चौकशी सुरू आहे.

कायदेशीर प्रक्रिया पूर्ण केल्यानंतर १८ नोव्हेंबर २०२५ रोजी ईडीने सिद्दीकी यांना अटक केली.

अल-फलाहच्या डॉक्टरांचा दहशतवादाशी संबंध

अल-फलाह युनिव्हर्सिटीशी संबंधित डॉ. मुजम्मिल शकील, डॉ. शाहीन सईद यांना आधीच फरीदाबाद दहशतवादी मॉड्यूल प्रकरणात अटक केली आहे. डॉ. उमर नबी, जो लाल किल्ल्याजवळ स्फोट झालेली ह्युंदाई i20 चालवत होता, हा देखील अल-फलाह युनिव्हर्सिटीत असिस्टंट प्रोफेसर होता.

स्फोटापूर्वी जम्मू-कश्मीर, हरियाणा आणि उत्तर प्रदेशमध्ये पसरलेले एक मोठे जाळे उघडकीस आले होते, जे जैश-ए-मोहम्मदशी जोडलेले असल्याचा संशय आहे. फरीदाबादमधील दोन खोलींतून २,९०० किलो स्फोटक साहित्य जप्त करण्यात आले होते.

National Stock Exchange
spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

News Danka Samarpan Parv
Star Housing Finance Limited

आम्हाला follow करा

113,459चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
288,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा