31 C
Mumbai
Friday, May 22, 2026
घरराजकारण'ठाकरे' राऊतांवर भडकले...गडकरींबद्दलच्या वक्तव्यावरून नाराजी!

‘ठाकरे’ राऊतांवर भडकले…गडकरींबद्दलच्या वक्तव्यावरून नाराजी!

काँग्रेसचे आमदार विकास ठाकरेंचे वक्तव्य

Google News Follow

Related

उबाठा गटाचे नेते संजय राऊत यांनी सामनाच्या लेखातून भाजपवर केलेल्या आरोपावर महाविकास आघाडीच्या नेत्यानेच उत्तर दिलं आहे.संजय राऊत यांनी आपल्या बोलण्यावर थोडं ताळतंत्र द्यावं, नागरपूच्या विषयात त्यांना कवडीचंही ज्ञान नाही, अशी टीका काँग्रेसचे आमदार विकास ठाकरे यांनी केली आहे.तसेच याबाबत काँग्रेसच्या वरिष्ठांना पत्र लिहिणार असल्याचे आमदार विकास ठाकरे यांनी म्हटले आहे.

संजय राऊत यांच्या आजच्या सामनाच्या रोखठोक लेखातून नितीन गडकरींच्या पराभवासाठी पंतप्रधान मोदी, अमित शाह आणि देवेंद्र फडणवीसांनी प्रयत्न केल्याचे म्हटले आहे.तसेच फडणवीसांनी रसद पुरवली असं संघाचे लोक सांगतात, असेही संजय राऊत यांनी म्हटले आहे.दरम्यान, संजय राऊतांच्या आरोपावर भाजपने जोरदार टीका केली जात आहे.या मालिकेत काँग्रेसचे आमदार विकास ठाकरे यांनी सुद्धा संजय राऊत यांच्यावर टीका केली आहे.

हे ही वाचा:

आयुष्यभर गटातटाचं राजकारण करणाऱ्या राऊतांना ‘भाजपचा परिवार’ काय कळणार!

दिल्लीतील बेबी केअर सेंटरला आग, ७ बालकांचा मृत्यू!

पाकिस्तानमध्ये कुराणच्या अवमानाचा आरोप करत जमावाचा ख्रिश्चनांवर हल्ला!

चारधाम यात्रेत १५ दिवसांत २०० कोटींहून अधिक व्यवसाय!

विकास ठाकरे म्हणाले की, संजय राऊत यांचा भाजपशी काही वाद असेल तर तो त्यांनी निपटून घ्यावा.पण महाविकास आघाडीत बंधनाचे काही नियम आहे ते लावून घ्यावे अन्यथा आम्हालाही बोलायला येते.आम्ही सुद्धा संजय राऊत यांच्या विरोधात खूप काही बोलू शकतो. मला हे कळत नाही की संजय राऊत हे , जेव्हा निवडणूक तोंडावर होती तेव्हा नितीन गडकरी यांनी प्रशंसा करत होते, निवडणूक झाल्यानंतरही गडकरींचीच प्रशंसा करत होते, एवढेच असेल तर ते महाविकास आघाडीमध्ये आलेच कशाला नितीन गडकरी यांच्या सोबत दुसरा पक्ष काढून महाविकास आघाडी करायची ना.ते पुढे म्हणेल, संजय राऊत यांनी आपल्या बोलण्यावर थोडं ताळतंत्र द्यावं, नागरपूच्या विषयात त्यांना कवडीचंही ज्ञान नाही.संजय राऊत यान नागपूरची एबीसीडी माहित नाहीये.

ते पुढे म्हणाले की, मी कुणाची रसद घेण्यासाठी भि@# नाही. आतापर्यंत अनेकदा निवडणूक लढली आहे. यंदाची ही निवडणूक नववी निवडणूक लढलो आहे.तुम्हाला भाजप बरोबर भांडण लावण्याचे काम दिलं आहे का?, नेमक तुमचं काय काम आहे, हे संजय राऊत यांनी दाखवून द्यावं.महाविकास आघाडीतील एक पक्ष असे बोलत असेल तर काँग्रेसने आपला विचार करावा आणि संजय राऊत यांना समज द्यावी अशी माझी मागणी राहील.मी आजच काँग्रेसच्या वरिष्ठांना पत्र लिहून संजय राऊत यांच्या बोलण्याचा अर्थ नेमका काय त्याबाबत विचारणार आहे, असे काँग्रेसचे आमदार विकास ठाकरे यांनी म्हटले आहे.

 

 

National Stock Exchange
spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

News Danka Samarpan Parv
Star Housing Finance Limited

आम्हाला follow करा

113,459चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
308,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा