34 C
Mumbai
Wednesday, March 4, 2026
घरराजकारणमहायुतीचे उमेदवार प्रकाश गंगाधरे यांच्या निवडणूक कार्यालयाचे उद्या भव्य उद्घाटन

महायुतीचे उमेदवार प्रकाश गंगाधरे यांच्या निवडणूक कार्यालयाचे उद्या भव्य उद्घाटन

Google News Follow

Related

भाजपा, शिवसेना (शिंदे गट) आणि रिपब्लिकन पक्ष (आठवले) यांच्या महायुतीकडून वॉर्ड क्रमांक १०४ साठी उमेदवार असलेल्या प्रकाश गंगाधरे यांच्या निवडणूक कार्यालयाचे भव्य उद्घाटन उद्या, शुक्रवार, २ जानेवारी रोजी सकाळी ८.३० वाजता पार पडणार आहे. माहिती तंत्रज्ञान व सांस्कृतिक कार्यमंत्री तसेच मुंबईचे पालकमंत्री आशिष शेलार यांच्या हस्ते या कार्यालयाचे उद्घाटन होणार आहे.

या कार्यक्रमाला भाजपाचे कोषाध्यक्ष व आमदार मिहीर कोटेचा, भाजप नेते किरीट सोमय्या, तसेच भाजप नेते व माजी खासदार मनोज कोटक यांची प्रमुख उपस्थिती असणार आहे. याशिवाय महायुतीतील विविध पक्षांचे स्थानिक पदाधिकारी, बूथ प्रमुख, कार्यकर्ते आणि मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित राहणार आहेत.

या उद्घाटनप्रसंगी महायुतीकडून वॉर्ड क्रमांक १०४ च्या सर्वांगीण विकासाचा आराखडा मांडण्यात येणार आहे. रस्ते, पाणीपुरवठा, स्वच्छता, आरोग्य सेवा, युवक व महिला सक्षमीकरण तसेच आधुनिक डिजिटल सुविधा यांना प्राधान्य देण्याचा निर्धार यावेळी व्यक्त करण्यात येणार आहे.

याबाबत उमेदवार प्रकाश गंगाधरे यांनी सांगितले की, “हे निवडणूक कार्यालय केवळ प्रचारापुरते मर्यादित न राहता, सर्वसामान्य नागरिकांच्या समस्या ऐकून त्यावर तत्काळ उपाययोजना करण्यासाठीचे प्रभावी व्यासपीठ ठरेल.”

National Stock Exchange
spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

News Danka Samarpan Parv
Star Housing Finance Limited

आम्हाला follow करा

113,459चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
296,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा