28.9 C
Mumbai
Saturday, October 17, 2026
घरराजकारण'हेलिकॉप्टरमधून फिरणारे लवकरच तुरुंगात जातील'

‘हेलिकॉप्टरमधून फिरणारे लवकरच तुरुंगात जातील’

बिहारच्या करकटमध्ये पंतप्रधान मोदींचे वक्तव्य

Google News Follow

पंतप्रधान नरेंद्र मोदी आज (२५ मे ) बिहार दौऱ्यावर आहेत.पंतप्रधान मोदींच्या बिहारमध्ये तीन सभा पार पडणार आहेत.दरम्यान, करकट लोकसभा मतदारसंघातील निवडणूक सभेला संबोधित करताना पंतप्रधान नरेंद्र मोदींनी मोठे विधान केले आहे. जनतेला संबोधित करताना पंतप्रधान मोदी म्हणाले की, नोकरीच्या बदल्यात जमीन हस्तांतरित करणाऱ्यांना लवकरच तुरुंगात पाठवले जाईल.हेलिकॉप्टरचा दौरा संपताच भ्रष्टाचार लोक तुरुंगात जातील, असे पंतप्रधान मोदी म्हणाले.राष्ट्रीय लोक मोर्चा एनडीएचे उमेदवार उपेंद्र कुशवाह यांच्या सभेला संबोधित करताना ते बोलत होते.

पंतप्रधान मोदी सभेला संबोधित करताना म्हणाले की, बिहारच्या लोकांना राजकारणाची चांगली जाण आहे. बिहारच्या जनतेला मताची ताकद माहीत आहे. त्यामुळे बिहारचे लोक विचारपूर्वक मतदान करतात.इंडी आघाडीवर हल्लाबोल करताना पीएम मोदी म्हणाले की, ४ जून रोजी निवडणुकीत यांचा पराभव होईल.तेव्हा लालूजी पराभवाचे खापर काँग्रेसवर फोडतील आणि त्याचवेळी काँग्रेस पक्ष पराभवासाठी खर्गे यांना जबाबदार धरेल.

हे ही वाचा:

अजय देवगण, रोहित शेट्टी यांनी जम्मू आणि काश्मीरमध्ये केले ‘सिंघम अगेन’चे शूटिंग!

पॅट कमिन्सचा हैदराबादचा संघ पुन्हा एकदा अंतिम फेरीत

अग्रवाल कुटुंबीयांनी चालकाचा फोन काढून घेतला, खोलीत डांबून ठेवले, जबाब देण्यासाठी धमकावले आणि….

१३ वर्षांपासून फरार आरोपी नागपुरात साधूच्या वेशात विकत होता जडीबुटी, पोलिसांकडून अटक!

इंडी आघाडीमधील लोक निराश आहेत, नकारात्मकतेने भरलेले आहेत.विरोधकांचे एकच राजकारण ते म्हणजे फक्त समोरच्याला भीती आणि धाक दाखवणे. मात्र, अशा धमकीला मोदी घाबरत नाही.४ जूनला हे लोक एकमेकांचे कपडे फाडतील.पराभवासाठी ते एकमेकांवर आरोप करताना दिसतील.काँग्रेस आणि आरजेडी डरपोक आहेत, असे पंतप्रधान मोदी म्हणाले.

National Stock Exchange
spot_img

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

113,459चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
338,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा