31 C
Mumbai
Monday, January 26, 2026
घरराजकारणअमित शहा आज मुंबईत येणार, पोलिसांचे सतर्कतेचे आदेश

अमित शहा आज मुंबईत येणार, पोलिसांचे सतर्कतेचे आदेश

या नियमांचे उल्लंघन करणाऱ्याविरोधात दंडात्मक कारवाई करण्यात येणार आहे.

Google News Follow

Related

दहशतवादी संघटनेच्या लक्ष्यावर असलेल्या मुंबईत केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या दौऱ्याच्या दरम्यान मुंबई पोलिसांकडून सतर्कता बाळगण्यात येत आहे. या पार्श्वभूमीवर मुंबई शहरासह उपनगरात ड्रोन, पॅरा ग्लायडर, सर्व प्रकारची फुगे, पतंग व रिमोट कंट्रोल मायक्रोलाइट एअरक्राफ्टवर बंदीचे आदेश मुंबई पोलिसांकडून जारी करण्यात आले आहेत.

केंद्रीय गृहमंत्री अमित शहा हे १५ एप्रिल ते १६ एप्रिल २०२३ रोजी मुंबई दौऱ्यावर आहेत.

दौऱ्याच्यावेळी दहशतवादी, समाजविरोधी घटकाकडून  ड्रोन, पॅरा ग्लायडर, रिमोट कंट्रोल मायक्रोलाईट एअरक्राफ्टचा वापर करून हल्ला करून मानवी जीवन, आरोग्य, सुरक्षितता आणि सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान होऊन गंभीर धोका निर्माण होण्याची शक्यता असल्याची भीती मुंबई पोलिसांनी जारी केलेल्या आदेशात नमूद करण्यात आली आहे. गृहमंत्र्यांचा कार्यक्रम असल्यामुळे मोठ्या संख्येने लोक एकत्र येण्याची शक्यता लक्षात घेऊन ही सावधगिरी बाळगण्यात येत आहे.

१५ ते १६ एप्रिल रोजी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर मुंबई पोलिसांकडून विमानतळ, सहार, कुलाबा, विलेपार्ले, खेरवाडी, वाकोला, सांताक्रूझ, वांद्रे, वरळी, गांवदेवी, डी.बी.मार्ग, मरिन ड्राईव्ह, कफ परेड आणि मलबार हिल पोलीस ठाणे यांच्या हद्दीत ड्रोन, पॅरा ग्लायडर, सर्व प्रकारचे फुगे, पतंग व रिमोट कंट्रोल मायक्रोलाइट एअरक्राफ्टवर बंदी घालण्यात आली आहे.

हे ही वाचा:

जगनमोहन रेड्डी यांचे पोस्टर फाडणाऱ्या कुत्र्याची केली तक्रार

…म्हणून डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी केली होती सावरकरांची स्तुती!

गौतम नवलाखांच्या आयएसआयशी संबंधांच्या शक्यतेवरून एनआयएने जामीन नाकारला  

म्हणजे संजय राऊतांनी मुख्यमंत्रीपदावर पाणी सोडले तर…

पोलिस उपायुक्त विशाल ठाकूर यांनी हे आदेश दिले आहेत. या आदेशांचे उल्लंघन करणारी कोणतीही व्यक्ती ही भारतीय दंड संहिता १८६० च्या कलम १८८ अंतर्गत दंडनीय असेल, असेही या आदेशात म्हटले आहे.

National Stock Exchange
spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

News Danka Samarpan Parv
Star Housing Finance Limited

आम्हाला follow करा

113,459चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
288,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा