पश्चिम बंगालमधील सत्ताधारी तृणमूल काँग्रेसचे आमदार हुमायून कबीर यांनी पुन्हा एकदा मुर्शिदाबाद जिल्ह्यात ६ डिसेंबर रोजी ‘बाबरी मशिदी’सारख्या मशिदीची पायाभरणी करणार असल्याचा पुनरुच्चार केला. यामुळे राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. तसेच त्यांना रोखले गेले तर त्या दिवशी राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ३४ मुस्लिमांच्या नियंत्रणात जाईल असा इशारा त्यांनी दिला आहे.
बेलडांगाचे आमदार कबीर हे गेल्या का2ही महिन्यांपासून आक्रमक भूमिका घेत आहेत. त्यांनी अलिकडेच एक नवीन संघटना स्थापन करण्याचा आपला विचार जाहीर केला. कबीर यांनी मुर्शिदाबाद प्रशासनावर “आरएसएस एजंट” म्हणून काम केल्याचा आरोप केला. त्यांनी अधिकाऱ्यांना त्यांचा कार्यक्रम थांबवण्याचा प्रयत्न करू नका, कारण ते आगीशी खेळण्यासारखे असेल असा इशारा दिला.
कबीर म्हणाले, “मी एक वर्षापूर्वी सांगितले होते की मी बेलडांगा येथील बाबरी मशिदीची पायाभरणी करेन. तुम्हाला का अडचण येत आहे? तुम्ही भाजपच्या सूचनांनुसार काम करत आहात का? पायाभरणी करण्यापासून रोखले गेले तर एनएच-३४ मुस्लिमांच्या ताब्यात असेल,” असा इशारा त्यांनी दिला आहे.
हे ही वाचा..
“बाबरी मशीद बांधण्यासाठी नेहरूंनी सार्वजनिक निधी मागितला होता”
पुतिन यांच्या भेटीपूर्वी भारत- रशियामध्ये ‘या’ लष्करी कराराला मिळाली मान्यता
“पाकिस्तानचे दावे हास्यास्पद!” भारताने फटकारले
त्रिपुरातून बाहेर जाताहेत अवैध स्थलांतरित
दुसरीकडे, तृणमूल काँग्रेसने कबीर यांच्या वक्तव्यापासून स्वतःला दूर ठेवले आहे. तृणमूलचे खासदार कल्याण बॅनर्जी यांनी कबीर यांचे राजकीय महत्त्व फेटाळून लावत म्हटले की, “पश्चिम बंगालमधील लोक ममता बॅनर्जीवर विश्वास ठेवतात. कोण काय म्हणते याने काही फरक पडत नाही.” तृणमूलने वारंवार सांगितले आहे की कबीर “वैयक्तिक” पातळीवर मत व्यक्त करत आहेत. पक्षाचे मुख्य प्रतोद निर्मल घोष यांनी यापूर्वी म्हटले होते की तृणमूल कबीर यांच्या संपर्कात नसून त्यांच्या कृतींना समर्थन देत नाही.







