32 C
Mumbai
Sunday, November 29, 2026
घरराजकारणव्यसनाधीनता, अमली पदार्थ हे तरुणांच्या स्वप्नांसमोरील मोठे अडथळे

व्यसनाधीनता, अमली पदार्थ हे तरुणांच्या स्वप्नांसमोरील मोठे अडथळे

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी मन की बातमध्ये केले भाष्य

Google News Follow

अमली पदार्थ आणि व्यसनाधीनता हे तरुणांच्या स्वप्नांसमोरील मोठे आव्हान बनले आहे. मात्र, अनेक तरुण दृढनिश्चय आणि इच्छाशक्तीच्या जोरावर व्यसनावर मात करून इतरांसाठी प्रेरणादायी ठरत आहेत, असे प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रविवारी मन की बातमध्ये केले. प्रत्येक महिन्याच्या अखेरच्या रविवारी सादर होणाऱ्या या कार्यक्रमात पंतप्रधान मोदी यांनी व्यसनाधीनतेच्या समस्येच्या विविध पैलूंवर भाष्य केले. देशात व्यसनमुक्तीच्या लढ्यात समाजाचा सक्रिय सहभाग वाढत असल्याबद्दल त्यांनी समाधान व्यक्त केले.

ते म्हणाले, “अमली पदार्थ आणि व्यसनाधीनता हे तरुणांच्या स्वप्नांसमोरील मोठे आव्हान बनले आहे. अनेक तरुण दृढनिश्चय आणि इच्छाशक्तीच्या बळावर अमली पदार्थांच्या व्यसनावर मात करत आहेत आणि आपल्या अनुभवातून इतरांनाही प्रेरणा देत आहेत.”

या कार्यक्रमादरम्यान पंतप्रधानांनी अमली पदार्थांच्या व्यसनातून मुक्त झालेल्या एका तरुणाशी संवाद साधला. यावेळी त्या तरुणाने व्यसनाधीनतेतून बाहेर पडताना आलेल्या अडचणी, संघर्ष आणि त्यावर मात करण्याचा आपला प्रवास सांगितला. पंतप्रधान मोदी यांनी ‘नशामुक्त युवा अभियान’ देशभरात वेगाने सुरू असल्याचाही उल्लेख केला.

हे ही वाचा:

त्रिपुरात बीएसएफ जवानांवरील हल्ला करणाऱ्यांच्या घरांवर हातोडा

कॅलिफोर्नियात ५.० तीव्रतेचा भूकंप; ४० हून अधिक धक्के

विमान वाहतूक क्षेत्रात अदानी समूहाची मोठी झेप

विजय सरकारची ‘सर्वोच्च’ धू धू धुलाई

याशिवाय पंतप्रधानांनी सरकारी कर्मचाऱ्यांसाठी उपलब्ध असलेल्या ‘आयजीओटी कर्मयोगी’ या ऑनलाइन प्रशिक्षण मंचाचाही उल्लेख केला. या मंचावर १७ भारतीय भाषांमध्ये सात हजारांहून अधिक अभ्यासक्रम उपलब्ध आहेत. ते म्हणाले, “सरकारी कर्मचाऱ्यांनी या मंचाच्या माध्यमातून लाखो अभ्यासक्रम पूर्ण केले आहेत. काही कर्मचारी कृत्रिम बुद्धिमत्तेचा (एआय) अभ्यास करत आहेत, तर काही भारतीय सांकेतिक भाषा शिकत आहेत.”

भारताची संग्रहालये जागतिक स्तरावर चर्चेत असल्याचे सांगताना पंतप्रधानांनी बिहारमधील पाटणा येथील बिहार संग्रहालयाचा विशेष उल्लेख केला. जगातील १०० सर्वोत्तम संग्रहालयांच्या यादीत बिहार संग्रहालयाने नववे स्थान मिळवले असून, या यादीत ते आशियात पहिल्या क्रमांकावर असल्याचे त्यांनी सांगितले.

याशिवाय गुजरातमधील वडनगर येथे उभारण्यात आलेल्या ‘अनंत अनादी वडनगर पुरातत्त्वीय अनुभव संग्रहालया’चाही पंतप्रधानांनी उल्लेख केला. वडनगर येथे पुरातत्त्व विभागाने केलेल्या उत्खननादरम्यान विविध ऐतिहासिक कालखंडांतील अनेक वस्तू सापडल्या होत्या. या उत्खननाच्या ठिकाणीच हे संग्रहालय विकसित करण्यात आल्याची माहिती पंतप्रधान मोदी यांनी दिली.

National Stock Exchange
spot_img

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

113,459चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
343,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा