23.9 C
Mumbai
Tuesday, January 20, 2026
घरराजकारणयेत्या पाच वर्षांत मुंब्रा हिरवा करू!

येत्या पाच वर्षांत मुंब्रा हिरवा करू!

एमआयएमची नगरसेविका सेहर शेखची आरोळी

Google News Follow

Related

महानगरपालिका निवडणुकांचे निकाल जाहीर झाल्यानंतर मुंब्र्यातला एक व्हीडिओ समोर आला आहे. या व्हीडिओमध्ये एकेकाळी राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे नेते जितेंद्र आव्हाड यांना एमआयएमचा नेता युनूस शेख आव्हान देताना दिसतो. त्याची मुलगी सेहर शेख हिनेदेखील आव्हाड यांची खिल्ली उडविल्याचा व्हीडिओदेखील व्हायरल होतो आहे. जितेंद्र आव्हाड आणि विरोधकांना ‘कैसे हराया…’असे म्हणत सहर शेख त्यांची थट्टा उडवतानाचा व्हीडिओ व्हायरल होत आहे.

राज्यातील २९ महानगरपालिकांत एमआयएमचे १२५ उमेदवार जिंकून आलेत. ठाणे मनपामध्येही त्यांचे ५ उमेदवार जिंकले आहेत. मुंब्र्यातील ३० क्रमांकाच्या प्रभागातही एमआयएमचे संपूर्ण पॅनल जिंकले. त्यांनी नवनिर्वाचित नगरसेविका सेहर शेख हिने जितेंद्र आव्हाड यांची खिल्ली उडवताना असे म्हटले की, येत्या पाच वर्षात संपूर्ण मुंब्रा आम्ही हिरवा करून टाकू.

मुंब्रा हा भाग जितेंद्र आव्हाड यांचा बालेकिल्ला मानला जातो. याच भागातून २०२४ला ते आमदार म्हणून निवडून आले. तेव्हा हीच सेहर शेख राष्ट्रवादीचा प्रचार करत होती. तेव्हा आव्हाड यांचा प्रचार करतानाचे तिचे व्हीडिओदेखील व्हायरल झाले होते. पण त्या निवडणुकीच्या काळात सेहरचे वडील युनूस शेख आणि आव्हाड यांच्यात प्रचंड भांडण झाले होते. त्यावेळी आव्हाड अगदी काकुळतीला येऊन युनूस शेख यांच्याशी संवाद साधताना दिसत होते. तर युनूस शेख हे आव्हाड यांना डोळे वटारून दाखवत असल्याचे दिसले होते. त्यानंतर शेख यांनी एमआयएम पक्षाची कास धरली.

हे ही वाचा:

वरळीत बेस्ट बसखाली आल्याने १८ वर्षीय तरुणाचा मृत्यू

पाण्याने भरलेल्या खड्ड्यातील अभियंत्याच्या मृत्यु्प्रकरणी बिल्डर अटकेत

भारत- बांगलादेश तणावादरम्यान ‘चिकन नेक’जवळ चीनी राजदूतांचा दौरा

अभिभाषणाच्या मसुद्यात चुकीचे दावे; तामिळनाडूच्या राज्यपालांचा सभात्याग

या भागातून अजित पवार यांचे नगरसेवक जिंकतील अशी शक्यता होती, पण लोकांना एमआयएम या मुस्लिमांच्या पक्षावर भरवसा दाखवला. त्यानंतर त्यांचे सगळे नगरसेवक ३० क्रमांकाच्या प्रभागातून निवडून आले. तेव्हा सेहरने भाषण केले की, आता आम्ही येत्या पाच वर्षात मुंब्रा हिरवे करू. सगळ्या विरोधकांना पळता भुई थोडी करू. पुढच्या निवडणुकीत निवडून येणारा प्रत्येक उमेदवार हा एमआयएमचाच असेल.

युनूस शेख यांच्या भाषणाचाही व्हीडिओ व्हायरल होत आहे. त्यात आव्हाडांना ते जेजे म्हणताना दिसत आहेत. तसेच माझ्या नादाला लागायचं नाही. मी वाटू लावून टाकेन. ज्यांना तुम्ही सोबत घेऊन फिरता ते पांडू लोक आहेत. आम्ही वाघ आहोत. आमच्या मध्ये आला तर परिणाम वाईट होतील, असे शेख म्हणताना दिसतात.

National Stock Exchange
spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

News Danka Samarpan Parv
Star Housing Finance Limited

आम्हाला follow करा

113,459चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
287,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा