30 C
Mumbai
Thursday, April 25, 2024
घरराजकारणमी जिवंत आहे...हयात असल्याचे दाखविण्यासाठी शेतकऱ्याचा आटापीटा

मी जिवंत आहे…हयात असल्याचे दाखविण्यासाठी शेतकऱ्याचा आटापीटा

Google News Follow

Related

परभणी जिल्ह्यातील प्रशासनाचा सावळा गोंधळ चव्हाट्यावर आला आहे. परभणीमध्ये एका शेतकऱ्याला कागदपत्री अज्ञात व्यक्तीने मृत दाखवले त्यामुळे तो शेतकरी सरकारी योजनेचा लाभ घेऊ शकला नाही. शेतकऱ्याला आपण जिवंत आहोत हे प्रशासनाला पटवून देण्यासाठी आपल्या जीवाचा आटापिटा करावा लागत आहे.

परभणीतील काष्टगाव येथील रहिवासी असलेले शेतकरी सीताराम सुरवसे (६५) असे या वृद्ध शेतकऱ्याचे नाव आहे. गेल्या दहा महिन्यापासून सुरवसे प्रशासन कार्यालयात खेटे मारत आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शेतकऱ्यांसाठी पंतप्रधान शेतकरी सन्मान योजना सुरू केली आहे. या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना २ हजार रुपये प्रमाणे वर्षाला सहा हजार रुपये देण्यात येतात. या योजनेचे आतापर्यंत अकरा हप्ते शेतकऱ्यांना मिळाले आहेत. त्यापैकी सुरवसे यांना सहा हप्ते सुरळीत आले आणि बाकीचे हप्ते आलेच नाहीत. सुरवसे यांनी शेतकरी सन्मान योजनेच्या पोर्टलवर चौकशी केली. त्यावेळी त्यांना एक धक्कादायक माहिती मिळाली. या पोर्टलवर कोणीतरी त्यांचे मृत झाल्याचे प्रमाणपत्र अपलोड केले होते. या प्रमाणपत्रामुळे त्यांना या योजनतून अपात्र ठरवण्यात आले होते.

मृत प्रमाणपत्र कोणी पोर्टलवर अपलोड केले याची माहिती मिळावी आणि आपण जिवंत आहोत याची माहिती पोर्टलवर भरावी यासाठी ते गेले दहा महिने प्रयत्न करत आहेत. गेले दहा महिने प्रयत्न करूनही काही साध्य होत नसल्याने सुरवसे यांनी आंदोलन देखील केले आहे. सुरवसे यांनी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष किशोर ढगे व कार्यकर्त्यांची मदत घेतली. आपण जिवंत आहोत आणि खाऊ पिऊ शकतो हे दाखविण्यासाठी सुरवसे यांनी शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांसह तहसील कार्यालयात बसून भाजी भाकर खाऊन आंदोलन केले. सुरवसे यांच्या प्रकरणावरून परभणी जिल्हा प्रशासनाचा सावळा गोंधळ चव्हाट्यावर आला आहे.

या प्रकरणाचा भारतीय जनता पार्टीचे नेते आणि आमदार अतुल भातखळकर यांनी निषेध केला आहे. हे सरकार बळीराजाच्या जीवावर उठले आहे असे ते म्हणाले आहेत. ट्विटरवर भातखळकरांनी प्रतिक्रिया दिली आहे. ते म्हणाले, परभणी जिल्ह्यातील सीताराम ज्ञानोबा सुरवसे या ६५ वर्षीय वृद्ध शेतकऱ्याला मृत दाखवून अनुदान बंद केल्यामुळे, आपण हयात आहोत हे पटवून देण्यासाठी गेल्या १० महिन्यांपासून जीवाचा आटापिटा करावा लागत आहे. हे आंधळे, मुके आणि ठार बहिरे महा विकास आघाडी सरकार बळीराजाच्या जीवावरच उठले आहे.

हे ही वाचा:

जिथे पेट्रोल, तिथे इथेनॉल

राणा दाम्पत्याला मुंबई महापालिकेकडून अल्टिमेटम

नवाब मलिकांचे दाऊदच्या टोळीशी थेट संबंध

शरद पवार घेणार ब्राह्मण संघटनांची भेट! ब्राह्मण महासंघाचा मात्र बहिष्कार

दरम्यान, माहितीचा अधिकार वापरून अनेक ठिकाणी अपील करूनही अद्याप कोणतीही माहिती देण्यात आलेली नाही असा आरोप सुरवसे यांनी केला आहे. योजनेचा लाभ मिळावा म्हणून त्यांनी तलाठी, मंडळ अधिकारी, तहसीलदार आणि जिल्हाधिकारी कार्यालयाचे उंबरठे झिजवले आहेत. प्रशासनाने वेळीच दखल घेऊन हेलपाटे वाचवावेत अशी मागणी सीताराम सुरवसे यांनी केली आहे.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
148,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा