पाकिस्तानविरुद्ध आणखी एक ‘ऑपरेशन’; सर्वपक्षीय खासदार परदेश दौऱ्यावर जाणार

प्रत्येक शिष्टमंडळात ५-६ खासदार असणार

पाकिस्तानविरुद्ध आणखी एक ‘ऑपरेशन’; सर्वपक्षीय खासदार परदेश दौऱ्यावर जाणार

पाकिस्तानविरुद्ध जागतिक स्तरावर राजनैतिक दबाव निर्माण करण्यासाठी भारत सरकारने मोठं पाऊल उचललं असून, सर्व पक्षांचे खासदार आता परदेश दौऱ्यावर जाणार आहेत. या दौऱ्याद्वारे ते परदेशातील सरकारांना अलीकडील संघर्ष आणि या संदर्भातील भारताची भूमिका स्पष्ट करणार असल्याची माहिती शुक्रवारी सूत्रांनी दिली.

संसदीय कार्य मंत्री किरेन रिजिजू हे या परदेश दौऱ्याचे समन्वयक असून, हा दौरा २२ मेनंतर सुरू होण्याची शक्यता आहे. खासदारांना यासाठी निमंत्रणेही पाठवण्यात आली आहेत. प्रत्येक प्रतिनिधिमंडळात ५-६ खासदार असतील, आणि ते अमेरिका, ब्रिटन, दक्षिण आफ्रिका, कतार आणि संयुक्त अरब अमिरात यांसारख्या देशांना भेट देतील.

ज्येष्ठ खासदारांना नेतृत्वाची जबाबदारी

या प्रतिनिधिमंडळांचे नेतृत्व वरिष्ठ खासदारांना देण्यात आले असून, विशेषतः एनडीएच्या खासदारांना हे दायित्व देण्यात आलं आहे. सूत्रांच्या मते, भारत-पाकिस्तान संबंधांमध्ये भारताची भूमिका स्पष्ट करण्यासाठी आणि पाकिस्तानविरोधात जागतिक पातळीवर ठाम संदेश देण्यासाठी सरकारने हा निर्णय घेतला आहे. या उपक्रमामुळे भारताला राजनैतिक आणि राजनैतिक मंचांवर मोठा प्रभाव टाकण्याची अपेक्षा आहे.

पाहलगाम हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर राजनैतिक हालचाली

२२ एप्रिल रोजी पाकिस्तानपुरस्कृत दहशतवाद्यांनी काश्मीरच्या पहलगाममध्ये केलेल्या भयंकर हल्ल्यानंतर भारत आणि पाकिस्तानमध्ये लष्करी तणाव वाढला होता. या हल्ल्यात २६ निष्पाप नागरिकांचा मृत्यू झाला. या घटनेनंतर भारताने ‘ऑपरेशन सिंदूर’ अंतर्गत प्रतिहल्ला केला आणि पाकिस्तान व पाकव्याप्त काश्मीरमधील दहशतवादी तळांवर लक्ष्य साधलं. पाकिस्ताननेही ड्रोनद्वारे भारतीय शहरं आणि लष्करी तळांवर हल्ल्याचा प्रयत्न केला, ज्यामुळे चार दिवसांचं युद्धसदृश वातावरण तयार झालं.

हे ही वाचा:

“पाकचे दहशतवादाशी संबंध उघड झाल्यानंतर निधी देणं मोठी चूक”

पाकिस्तानच्या खोट्या बातमीचे ‘विमान’ कोसळले

तिथे बोरॉन आले, इथे बरनॉल येऊ दे…

पाकिस्तानच्या खोट्या बातमीचे ‘विमान’ कोसळले

१० मे रोजी भारत आणि पाकिस्तानमधील वरिष्ठ लष्करी अधिकाऱ्यांमध्ये झालेल्या चर्चेनंतर दोन्ही देशांमध्ये तणाव कमी करण्याचं ठरलं. ऑपरेशन सिंदूरनंतर सरकारने सर्वपक्षीय बैठक बोलावली आणि राजकीय नेत्यांना सुरक्षेची परिस्थिती आणि आगामी रणनीतीबाबत माहिती दिली. या बैठकीत विरोधकांनीही पाकिस्तानविरोधात सरकारच्या भूमिकेला पाठिंबा दिला. सरकारने एकाचवेळी विविध देशांतील परराष्ट्र मंत्र्यांशी आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांशी संपर्क साधत आंतरराष्ट्रीय पातळीवर समर्थन मिळवण्यासाठी प्रयत्न सुरू केले.

पाहलगाम हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर भारत सरकारने पाकिस्तानविरोधात अनेक राजनैतिक निर्णय घेतले आहेत:

Exit mobile version