25 C
Mumbai
Friday, February 13, 2026
घरराजकारण'काँग्रेसच्या नैतिकतेने आता तळ गाठलाय!'

‘काँग्रेसच्या नैतिकतेने आता तळ गाठलाय!’

पंतप्रधानांबाबतचा एआय निर्मित व्हीडिओ काँग्रेसने केला शेअर, महेश जेठमलानी यांनी केली टीका

Google News Follow

Related

भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची प्रतिमा डागाळण्यासाठी सातत्याने जगभरातील अनेक लोक कामाला लागलेले आहेत. भारतीय राष्ट्रीय काँग्रेसही त्यातलाच एक घटक असल्याची टीका आता होऊ लागली आहे. त्याचे कारण म्हणजे ३ फेब्रुवारीला काँग्रेसच्या अधिकृत एक्स हँडलवरून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा एक एआय निर्मित व्हीडिओ व्हायरल करण्यात आला. त्यात एपस्टिन आणि मोदी एका गाडीतून प्रवास करताना दाखवून त्यांनी कशी अमेरिकेशी तडजोड केली अशी एक कथा रचण्यात आली. त्यावरून सर्वोच्च न्यायालयाचे वकील आणि राज्यसभेचे माजी खासदार महेश जेठमलानी यांनी काँग्रेसवर प्रहार केला आहे.

त्यांनी काँग्रेसचा हा व्हीडिओ जोडत त्यावर टीका केली आहे. ते लिहितात की, पंतप्रधानांना लक्ष्य करण्यासाठी एआय-निर्मित व्हिडिओंचा वापर करणे ही काँग्रेससाठी नैतिक अधःपतनाची परिसीमा आहे. जेव्हा तथ्ये आणि वैचारिक चर्चेऐवजी डीपफेक्स आणि फसवणुकीचा मार्ग स्वीकारला जातो, तेव्हा ती नैतिक दिवाळखोरी ठरते. गांधी घराण्याच्या नेतृत्वाखालील काँग्रेसचे हे फलित आहे—जिथे पक्ष विचारधारेऐवजी कौटुंबिक जहागिरीत रूपांतरित झाला, हक्कभावनेने तत्त्वांना विस्थापित केले आणि सत्याऐवजी दिखाव्याला प्राधान्य दिले, तिथे आणखी काय अपेक्षा करणार.

हे ही वाचा:

सोने- चांदी पुन्हा चमकले! चांदीच्या किंमती १६,००० रुपयांनी वाढल्या

“चिकन नेक” कॉरिडॉर अधिक सुरक्षित! भूमिगत रेल्वे ट्रॅक बनवणार

लोकसभेतून ८ काँग्रेस खासदारांचे निलंबन

भारत- अमेरिका करारामुळे ‘या’ प्रमुख क्षेत्रांना मोठा फायदा

राजकारण अराजकतावादी आणि कट्टर डाव्या, देशविरोधी घटकांकडे सोपवले की असेच होते. सत्यापेक्षा खोटे अधिक वेगाने ट्रेंड होते—म्हणून ते खोट्यांचीच निवड करतात, असेही त्यांनी म्हटले आहे. ते पुढे लिहितात की, ज्या पक्षाचे नेतृत्व अधिकारांच्या नशेत बुडालेले असते तिथे कल्पना किंवा धैर्य असलेले लोक टिकत नाहीत; तिथे सर्वाधिक मोठ्याने चमचेगिरी करणाऱ्यांचीच निवड होते, असेही त्यांनी लिहिले आहे

काँग्रेसकडे जर अजूनही किंचितशी नैतिकता उरली असेल, तर तिने सर्वांना हाकलून द्यावे आणि लोकशाहीकडे तिच्या अपेक्षित गांभीर्याने पाहायला सुरुवात करावी. ही कारवाई राहुल गांधींपासूनच सुरू व्हायला हवी. बनावटपणावर आधारित राजकारण हे धैर्य नाही; तो पूर्णपणे कोसळण्याचा संकेत आहे, असेही जेठमलानी यांनी म्हटले आहे.

National Stock Exchange
spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

News Danka Samarpan Parv
Star Housing Finance Limited

आम्हाला follow करा

113,459चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
291,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा