मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी मनोज जरांगे पाटील धडपडत आहेत.मराठा समाजाला सरसकट कुणबी दाखले देण्याची त्यांची मागणी आहे.पंरतु जरांगे पाटलांचं हे आंदोलन हे मराठा समाजाच्या मुलांसाठी नसून राजकीय फायद्यासाठी आहे असा आरोप काँग्रेस नेते व विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी जरांगे यांच्यावर केला आहे.तसेच मराठा समाजाला ओबीसींच्या जातीमध्ये येऊन फार फायदा देखील होणार नसल्याचे वडेट्टीवार म्हणाले.शुक्रवारी माध्यमांशी बोलताना ते बोलत होते.
मराठा समाजाच्या आरक्षणाची एकहाती बाजू जरांगे यांनी उचलून धरली आहे.मराठा समाजाला आरक्षण मिळत नाही तो पर्यंत शांत बसणार नसल्याचे जरांगे यांनी सांगितले आहे.मात्र, जरांगे यांच्या आरक्षणाच्या भूमिकेवर काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी बोट ठेवत आरोप केले आहे.ते म्हणाले, “जरांगे मराठा मुलांच्या भल्यासाठी नाही, तर राजकीय फायद्यासाठी सरसकट कुणबी प्रमाणपत्राची मागणी करत आहेत,”
विजय वडेट्टीवार म्हणाले, “मराठा समाजाला १० टक्के ईडब्ल्यूस आरक्षणातून फायदा होत असेल, तर तो मोठा फायदा आहे. परंतू मनोज जरांगे पाटील यांना ईडब्ल्यूस आरक्षणापेक्षा राजकीय आरक्षणाचा फायदा घेण्याची भूमिका असावी. म्हणून ते आग्रही आहेत. मनोज जरांगे मराठा मुलांच्या भल्यासाठी आग्रही नाहीत, तर राजकीय फायद्यासाठी आग्रही आहेत, असा माझा त्यांच्यावर थेट आरोप असल्याचे ते म्हणाले.
हे ही वाचा:
‘भिवंडीतील पडघा हे गाव सीरियासारखे! शरियाचे होते पालन…’
वरळी सी लिंकवर गाड्या धडकल्या तीन मृत्यू
रेव्ह पार्टीमध्ये सापांची व्यवस्था गायक फाझिलपुरियाने केली!
उद्धव ठाकरे यांनी केला सरन्यायाधीशांचा अवमान; ठाकरेंविरुद्ध अवमानाच्या खटल्यासाठी परवानगीची मागणी
सरसकट कुणबी आरक्षणाच्या मागणीमुळे मराठा तरुणांचं नुकसान
तसेच सरसकट कुणबी आरक्षणाच्या मागणीमुळे मराठा तरुणांचं खूप मोठं नुकसान होणार आहे. मराठा तरुणांनी याचा अभ्यास करावा. त्यांनी जरांगे पाटलांच्या म्हणण्याप्रमाणे सगळे काही ठरवू नये. अभ्यास करून त्यांच्या भविष्याचा निर्णय घ्यावा, असं माझं त्यांना आवाहन आहे. मुळात मराठा समाज ओबीसींच्या ३७२ जातींमध्ये येऊन फार फायदा होणार नाही. ईडब्ल्यूस आरक्षणात फार जाती नाहीत,” असं मत विजय वडेट्टीवार यांनी व्यक्त केलं.
ओबीसी आरक्षणापेक्षा ईडब्ल्यूएस आरक्षणाचा अधिक फायदा होईल
विशेष म्हणजे ओबीसी आरक्षणापेक्षा ईडब्ल्यूएस आरक्षणाचा अधिक फायदा होईल असं सांगताना विजय वडेट्टीवार म्हणाले, “खुल्या प्रवर्गात फार जाती शिल्लक राहणार नाहीत. म्हणजे नोकऱ्यांचा किंवा सवलतीचा जिथं संदर्भ येतो तेथे मराठा तरुणांचं फार मोठं नुकसान होणार आहे. अशास्थितीत मराठा तरूणांनी अभ्यास करून विचार करण्याचे गरजेचे असल्याचे वडेट्टीवार यांनी म्हटले.







