25 C
Mumbai
Friday, January 30, 2026
घरक्राईमनामा१६ दिवसांनी अखेर करुणा शर्माची सुटका

१६ दिवसांनी अखेर करुणा शर्माची सुटका

Google News Follow

Related

करुणा शर्माला जामीन मंजूर

करुणा शर्मा यांना अखेर जामीन मंजूर करण्यात आला आहे. करुणा शर्मा यांच्या जामीन अर्जावरील सुनावणीचा निकाल अंबाजोगाई जिल्हा सत्र न्यायलयाने दिला. मात्र चार्जशीट दाखल होईपर्यंत शर्मा यांना परळी आणि अंबाजोगाई तालुक्यात येण्यास निर्बंध घालण्यात आले आहे. २५ हजार रुपयांच्या जात मुचलक्यावर शर्मांना जामीन मंजूर करण्यात आला आहे. करुणा शर्मा यांना ५ सप्टेंबरला अटक झाली होती. जवळपास १६ दिवसांनी त्यांची न्यायालयीन कोठडीतून सुटका झाली आहे. शर्मांसह त्यांचे चालक अजय मोरेंनाही जामीन मिळाला आहे.

सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांच्याविरोधात पत्रकार परिषद घेण्यासाठी त्या बीड जिल्ह्यातील परळीमध्ये आल्या होत्या. त्यावेळी अनुसूचित जाती जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्याखाली गुन्हा दाखल झाल्यानंतर त्यांना बेड्या ठोकण्यात आल्या होत्या. त्यांची रवानगी  बीड कारागृहात न्यायालयीन कोठडीत करण्यात आली होती.

करुणा शर्मा यांना पाच सप्टेंबरला अटक झाली होती. करुणा शर्मांनी आपण धनंजय मुंडे यांच्या विरोधात पत्रकार परिषद घेणार असल्याची घोषणा करुन खळबळ उडवून दिली होती. त्यासाठी त्या परळी येथे आल्यानंतर एका महिलेला जातिवाचक शिवीगाळ करत प्राणघातक हल्ला केल्याच्या आरोपाखाली करुणा शर्मा आणि त्यांचा सहकारी अरुण मोरे यांच्यावर गुन्हा दाखल झाला होता. परळी पोलिसांनी त्यांना ५ सप्टेंबर रोजी अटक केली होती. तर ६ सप्टेंबर रोजी त्यांना न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली होती.

हे ही वाचा:

जस्टिन ट्रुडो यांनी पायावर धोंडा पाडून घेतला

कायदा सुव्यवस्थेच्या प्रश्नावर दोन दिवसांचं विशेष अधिवेशन बोलावा

भारतीय लसवंतांविरुद्ध ब्रिटनचा वर्णद्वेषी निर्णय

मोदी सरकारच्या ‘या’ निर्णयामुळे लष्करी अधिकाऱ्यांची कमतरता दूर होणार

करुणा शर्मा यांच्या गाडीत पिस्तूल आढळून आलं होतं. त्यामुळे शर्मा यांचे चालक अजय मोरेंवरही गुन्हा दाखल करण्यात आला होता. तसेच शर्मा यांच्यावर जातीवाचक शिवीगाळ केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला होता.

दरम्यान, करुणा शर्मा यांच्या गाडीच्या डिक्कीत पिस्तूल ठेवल्याचा एक व्हिडीओ व्हायरल झाला होता. या व्हिडीओत शर्मा यांची गाडी बाजारात आल्याचं दिसत होतं. गाडीभोवती गर्दी झाल्याने ही गाडी काही थोडा वेळ बाजारात थांबली. त्याच संधीचा फायदा घेत एका व्यक्तीने शर्मा यांच्या कारची डिक्की उघडली. तर पिवळी ओढणी परिधान केलेली महिला कारमध्ये काही तरी ठेवताना दिसत होती. त्यानंतर ही गाडी पुढे निघून गेल्याचं या व्हिडीओत दिसत होतं.

National Stock Exchange
spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

News Danka Samarpan Parv
Star Housing Finance Limited

आम्हाला follow करा

113,459चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
289,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा