30.1 C
Mumbai
Sunday, February 5, 2023
घरराजकारणकिरीट सोमय्यांनी दिले संजय राऊत, उद्धव ठाकरेंना आव्हान

किरीट सोमय्यांनी दिले संजय राऊत, उद्धव ठाकरेंना आव्हान

पत्रकार परिषदेमध्ये किरीट सोमय्यांनी कागदपत्रे दाखवली आहेत.

Google News Follow

Related

आयएनएस विक्रांत निधी अपहार आणि शौचालय घोटाळा प्रकरणी भाजपा नेते किरीट सोमय्या यांना क्लीन चिट मिळाली आहे. क्लीन चिटनंतर किरीट सोमय्या यांनी पत्रकार परिषद घेत ठाकरे गटावर निशाणा साधला आहे. यावेळी किरीट सोमय्यांनी संजय राऊत आणि उद्धव ठाकरे यांना जाहीर आव्हान दिलं आहे.

क्लीन चिटबद्दल ऐकलं तर संजय राऊतांच्या घरात भूकंप येईल. सोमय्या कुटुंबाने शंभर कोटींचा शौचालय घोटाळा करत घाण केली, असं संजय राऊत यांनी म्हटले होते. पण मग आता महाराष्ट्राच्या राजकारणाची घाण कोणी केली? असा सवाल किरीट सोमय्या यांनी केला आहे. पत्रकार परिषदेमध्ये किरीट सोमय्यांनी कागदपत्रे दाखवली आहेत. तसेच संजय राऊत यांनी केलेल्या आरोपांचा व्हिडिओही दाखवला आहे.

संजय राऊतांमध्ये हिंमत असेल तर त्यांनी राजेश नार्वेकर कोण आहेत हे सांगावं. तसेच उद्धव ठाकरेंनी त्यांच्या अध्यक्षतेखाली बैठक घेऊन लक्ष ठेवलं जात होतं की नाही हे सांगावं, असं आव्हान किरीट सोमय्यांनी त्यांना दिलं आहे. संजय राऊतांकडे घोटाळ्याची कागदपत्रं कशी आली? राजेश नार्वेकर यांनी दिली की उद्धव ठाकरेंनी, असा खोचक सवाल किरीट सोमय्यांनी केला आहे.

हे ही वाचा : 

महेश्वरास्त्र, शत्रूला पळो की सळो करून सोडणार

चक्क महिलेच्या शरीरातून काढल्या कोकेनच्या कॅप्सूल

‘आगामी निवडणूका एकनाथ शिंदेंच्या नेतृत्वाखाली लढणार’

राज्यात आज ग्रामपंचायतींच्या निवडणुका

ठाण्याचे जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर यांनी तुमच्यावर फौजदारी कारवाईला सुरुवात करत असल्याची नोटीस दिली होती. ते ठाणे जिल्ह्यातील पर्यावरण विभागाच्या मॉनिरटिंग कमिटीचे अध्यक्ष आहेत. महत्त्वाचं म्हणजे ते संजय राऊतांचे व्याही आहेत. संजय राऊत यांच्या मुलीच्या लग्नात किती खर्च झाला यासाठी डेकोरेटवर दबाव आणला म्हणून बोंबलत होते, त्या मुलीचे ते सासरे आहेत. त्यांनीच आम्हाला क्लीन चिट दिली आहे, असंही किरीट सोमय्यांनी संगोतले आहे.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

आम्हाला follow करा

49,911चाहतेआवड दर्शवा
2,002अनुयायीअनुकरण करा
61,400सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा