26 C
Mumbai
Thursday, December 9, 2021
घरराजकारण'कुणाचा नवरा हिंदू की मु्स्लिम याचे नवाब मलिक आणि मीडियाला काय देणेघेणे?'

‘कुणाचा नवरा हिंदू की मु्स्लिम याचे नवाब मलिक आणि मीडियाला काय देणेघेणे?’

Related

समीर वानखेडे यांच्या पत्नी क्रांती यांनी विचारला सवाल

गेले काही दिवस नवाब मलिक यांच्या आरोपांवरून समीर वानखेडे आणि त्यांच्या कुटुंबियांपुढे सवाल उपस्थित करणाऱ्या मीडियाला रविवारी झालेल्या पत्रकार परिषदेत समीर वानखेडे यांच्या पत्नी क्रांती रेडकर यांनी खडसावले. नवाब मलिक आणि तुम्हाला सगळ्यांना कुणाचा नवरा कोण आहे, कुणाचा नवरा हिंदू आहे की मुस्लिम आहे याच्याशी काय देणेघेणे आहे? या सगळ्याचा ड्रग प्रकरणाशी काय संबंध आहे. मलिक यांचा जावई ड्रग्स प्रकरणात पकडला गेला तेव्हा त्याला पकडणारा हिंदू आहे की मुस्लिम आहे याचा कसा काय संबंध असू शकतो? मलिकांचा जावई समीर खानकडे किती ड्रग्स सापडले हे तुम्ही विचारत नाही. तुम्हाला मलिकांनी गुंडाळून ठेवले आहे. त्यामुळे तुम्ही रोज उठून आमच्याकडे कॅमेरे घेऊन येता आणि आम्हाला विचारत बसता. आम्ही या सगळ्याला कंटाळलो आहोत, अशा शब्दांत क्रांती रेडकर यांनी पत्रकार परिषदेत मीडियाला धारेवर धरले.

रिपब्लिकन पार्टीचे नेते खासदार रामदास आठवले यांना वानखेडे कुटुंबीय रविवारी भेटले आणि त्यांनी सगळी कागदपत्रे त्यांना दाखविली. त्यानंतर पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी आठवले यांनीही आपण वानखेडे कुटुंबियांच्या पाठीशी असल्याचे सांगितले.

क्रांती रेडकर त्यावेळी म्हणाल्या की, फ्रॉड कोण आहेत समीर वानखेडे की नवाब मलिक हे स्पष्ट करण्यासाठी आम्ही इथे आलो आहोत. मलिकांचे सगळे आरोप खोटे ठरले आहेत. माझे सासरे सगळी कागदपत्रे तुम्हाला दाखवणार आहेत. जे मीडिया, लोक आमच्या जाती धर्माचा उल्लेख करतात त्यांनी डोळे उघडे ठेवून सत्य स्वीकारावे.

 

हे ही वाचा:

गाणाऱ्या व्हायोलिनचे सूर हरपले; प्रभाकर जोग कालवश

भोपळा झाला सर्वाधिक मार्कांनी ‘पास’

‘युवराजांचे बाबा झाले ‘एसटी’ कामगरांचे यमराज’

दिवाळीसाठी रोषणाई करताना कुटुंबाला लागला विजेचा धक्का; एकाचा मृत्यू  

 

यावेळी ज्ञानदेव वानखेडे यांनीही प्रतिक्रिया व्यक्त केली. ते म्हणाले की, मी जन्मल्यापासून शाळेच्या दाखल्यापर्यंत एनसीसी आणि सर्व्हिसला लागल्यापासूनचे सर्व कागदपत्रं आणली आहेत. मी कधीही धर्मांतर केलेले नाही. मी महार जातीतील आहे. मी मुस्लिम महिलेशी १९७८ मध्ये लग्न केलं आहे. ते मी हिंदू पद्धतीने लग्न केलं आहे. समीर आणि मी कधीही धर्मांतर केलं नाही. मी आंबेडकरवादी, जयभीमवाला आहे. महार जातीचा आहे. मला त्याचा मला अभिमान आहे. आमच्यावरील खासगी आरोप थांबवा. प्रश्न फक्त ड्रग्जचा आहे. मलिकांच्या जावयाला अटक केल्यामुळे ते आम्हाला बदनाम करत आहेत. तुम्हाला जर वाटत असेल तर तुम्ही कोर्टात जा पण आमची बदनामी करू नका, असं त्यांनी सांगितलं.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

आम्हाला follow करा

2,721चाहतेआवड दर्शवा
1,516अनुयायीअनुकरण करा
4,940सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा