आयुष्यभर कधीही भाजपसोबत जाणार नाही. भाजपला संपविण्याचा प्रयत्न आम्ही करणार आहोत. काँग्रेसला मस्ती होती म्हणून भाजपसोबत गेलो होतो. अशी टीका राष्ट्रीय समाज पक्षाचे अध्यक्ष महादेव जानकर यांनी केली. ते आज अकोल्यात आले असताना त्यांनी ही प्रतिक्रिया दिली आहे.
आज अकोल्यात समाजवादी पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष महादेव जानकर यांनी एका बैठकीत पक्ष कार्यकर्त्यांकडून संघटन बांधणीचा आढावा घेतला.
दरम्यान समाजवादी पक्षाच्या निवडणुका या आपआपल्या ताकदीवर लढवल्या जातील.. महाविकास आघाडीने जागा दिल्या तर त्यांच्यासोबत जायला तयार आहे. मात्र पुन्हा एनडीएचे सरकार राज्यात येऊ नये यासाठी प्रयत्न करणार असल्याचं जानकर म्हणाले. समाजवादी पक्ष आपल्या ताकतीवर कशा जास्त जागा जिंकेल याचा प्रयत्न संघटन बांधणीतुन केल्या जाणार आहे. तर वंचित बहुजन आघाडीलाही त्यांनी यावेळी टोला लगावला तर हे सरकार मुख्यमंत्री यांच्या पासून तर सर्व सरकार व्यभिचारी असल्याची टीकाही त्यांनी यावेळी केली.







