भारतीय जनता पार्टीने (भाजप) रविवारी महाराष्ट्राचे राज्यपाल सीपी राधाकृष्णन यांना राष्ट्रीय लोकशाही आघाडीचे (एनडीए) उपराष्ट्रपतीपदासाठी उमेदवार म्हणून घोषित केले.
हा निर्णय भाजप संसदीय मंडळाच्या बैठकीत घेण्यात आला. जर ते निवडून आले तर राधाकृष्णन हे जुलै महिन्यात आरोग्याच्या कारणास्तव राजीनामा दिलेले उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांचे उत्तराधिकारी ठरतील.
स्रोतांच्या माहितीनुसार, राधाकृष्णन मंगळवारी होणाऱ्या एनडीए संसदीय पक्षाच्या बैठकीला देखील उपस्थित राहू शकतात.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एक्स (X) वर राधाकृष्णन यांचे अभिनंदन करताना लिहिले, सार्वजनिक जीवनातील त्यांच्या दीर्घ कारकिर्दीत, थिरू सीपी राधाकृष्णनजी यांनी आपल्या समर्पण, विनम्रता आणि बुद्धिमत्तेमुळे विशेष स्थान निर्माण केले आहे. त्यांनी घेतलेल्या विविध जबाबदाऱ्यांमध्ये ते नेहमी समाजसेवा आणि वंचितांचे सशक्तीकरण यावर लक्ष केंद्रीत करत आले आहेत. तामिळनाडूमध्ये त्यांनी तळागाळात व्यापक काम केले आहे. एनडीए परिवाराने त्यांची उपराष्ट्रपती पदासाठी उमेदवारी निश्चित केल्याबद्दल मला आनंद होत आहे.”
यावर प्रत्युत्तर देताना राधाकृष्णन यांनी लिहिले, आमचे सर्वांच्या लाडके, अत्यंत आदरणीय पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांनी मला एनडीएचा उपराष्ट्रपतीपदाचा उमेदवार म्हणून नामनिर्देशित केल्याबद्दल व देशसेवेची संधी दिल्याबद्दल मी मनःपूर्वक आभार मानतो.”
सीपी चंद्रपुरम पोनुस्वामी राधाकृष्णन यांचा जन्म २० ऑक्टोबर १९५७ रोजी तिरुप्पूर, तामिळनाडू येथे झाला.
एनडीएच्या अनेक नेत्यांनी राधाकृष्णन यांना पाठिंबा दिला आहे. यात लोक जनशक्ती पार्टी (राम विलास) चे प्रमुख चिराग पासवान, राष्ट्रीय लोक दलाचे जयंत सिंह, जन सेना पार्टीचे पवन कल्याण, तेलुगू देशम पक्षाचे प्रमुख एन. चंद्राबाबू नायडू आणि हिंदुस्तानी अवाम मोर्चाचे नेते जीतन राम मांझी यांचा समावेश आहे.
हे ही वाचा:
अर्ध उष्ट्रासनाने मिळवा पाठदुखीतून आराम
पाकिस्तान : पुरामुळे ३१४ मृत्यू, १५६ जखमी
‘सात दिवसात पुरावे द्या, नाहीतर देशाची माफी मागा’
फायरिंगमुळे एल्विशच्या वडिलांनी व्यक्त केली चिंता
शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे गट) चे खासदार संजय राऊत यांनीही त्यांचे अभिनंदन करताना म्हटले,
“ते अतिशय चांगले व्यक्तिमत्त्व आहे, वादग्रस्त नाहीत. त्यांना खूप अनुभव आहे. मी त्यांना शुभेच्छा देतो.”
राधाकृष्णन यांनी आपल्या राजकीय प्रवासात अनेक महत्त्वाच्या भूमिका सांभाळल्या आहेत. त्यांनी ३१ जुलै २०२४ रोजी महाराष्ट्राचे राज्यपाल म्हणून कार्यभार स्वीकारला. यापूर्वी ते १८ फेब्रुवारी २०२३ ते ३० जुलै २०२४ दरम्यान झारखंडचे राज्यपाल होते. तसेच मार्च ते जुलै २०२४ मध्ये ते तेलंगणाचे राज्यपाल, तर मार्च ते ऑगस्ट २०२४ मध्ये केंद्रशासित प्रदेश पुदुच्चेरीचे उपराज्यपाल म्हणून अतिरिक्त जबाबदारी सांभाळत होते.
भारताचे नवीन उपराष्ट्रपती निवडण्यासाठी निवडणूक आयोगाने ७ ऑगस्ट रोजी अधिसूचना काढली आहे. ही निवडणूक ९ सप्टेंबरला होणार आहे. अधिसूचनेत नामनिर्देशन अर्ज दाखल करण्याच्या व उमेदवारी मागे घेण्याच्या तारखाही स्पष्ट करण्यात आल्या आहेत.
ही निवडणूक जगदीप धनखड यांच्या अनपेक्षित राजीनाम्यानंतर होत आहे. त्यांनी राज्यसभेचे अध्यक्ष म्हणून पावसाळी अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी सभागृह चालवल्यानंतर राजीनामा दिला होता.
या राजीनाम्यानंतर राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले. काँग्रेस नेते जयराम रमेश यांनी म्हटले की, या राजीनाम्यामागे “डोळ्यासमोर दिसते त्यापेक्षा खूप काही असावे.” त्यांनी उघड केले की, राजीनाम्याच्या बातमीच्या दोन तास आधीच त्यांनी ७४ वर्षीय धनखड यांच्याशी दूरध्वनीवर बोलणे केले होते आणि तेव्हा ते पूर्णतः सामान्य वाटत होते.







