25 C
Mumbai
Monday, December 29, 2025
घरराजकारणआज ग्रामपंचायत निवडणुकीत होणार शक्तिपरीक्षण

आज ग्रामपंचायत निवडणुकीत होणार शक्तिपरीक्षण

Google News Follow

Related

आज १५ जानेवारी रोजी महाराष्ट्रातील १४,२३४ ग्रामपंचायतींचे मतदान होणार आहे. राज्यातील तब्बल ३४ जिल्ह्यांमधील लाखो नागरिक आपला मतदानाचा हक्क बजावणार आहेत. या निवडणुकीची मतमोजणी १८ जानेवारी रोजी होणार आहे. ही निवडणूक राजकीय पक्षांच्या चिन्हावर होणार नसली तरीही राजकीय पक्ष या निवडणुकीत आपली ताकद अजमावणार आहेत.

या निवडणुकीत सरपंचाची निवड थेट जनतेतून होणार नाहीये. सरपंचाची निवड ग्रामपंचायत सदस्यांमधुन होणार आहे. देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असताना सरपंचांची निवड थेट जनतेतून व्हावी असा निर्णय राज्य सरकारने घेतला होता. पण ठाकरे सरकार सत्तेत आल्यावर या निर्णयात बदल करत पुन्हा पूर्वीसारखे ग्रामपंचायत सदस्यांमार्फत सरपंच निवडला जावा असा निर्णय घेतला गेला.

कोविड १९ परिस्थितीमुळे विशेष दक्षता
या निवडणुकीत कोविड परिस्थितीचा विचार करून काही विशेष निर्णय घेण्यात आले आहेत. मतदानाची वेळ सकाळी ७.३० वाजल्यापासून संध्याकाळी ५.३० वाजेपर्यंत आहे पण गडचिरोली आणि गोंदिया जिल्ह्यातील चार तालुक्यांमध्ये दुपारी ३ पर्यंत मतदान होणार आहे. कोरोना बाधित रुग्ण आणि विलगीकरण कक्षातील व्यक्तींनाही मतदान करता येणार आहे. त्यासाठी मतदानाचा शेवटचा अर्धा तास शिल्लक असताना ते मतदानाचा हक्क बजावू शकणार आहेत. या व्यतिरिक्त दोन वेळा तपासणी करूनही ज्यांच्या शरीराचे तापमान हे विहीत निकषांपेक्षा अधिक आहे अशा व्यक्तींनाही मतदान करता येणार आहे.

कोणत्या जिल्ह्यात किती ग्रामपंचायतींच्या निवडणूका?
महाराष्ट्राच्या सर्वच जिल्ह्यातील ग्रामपंचायतींसाठी मतदान होणार आहे. यामध्ये जिल्हानिहाय नंदुरबार-८७, धुळे-२१८, जळगाव-७८३, नाशिक-६२१, अहमदनगर-७६७, पालघर-३, ठाणे-१५८, रायगड-८८, रत्नागिरी-४७९, सिंधुदुर्ग-७०, कोल्हापूर- ४३३, सांगली-१५२, सोलापूर-६५८, सातारा-८७९, पुणे-७४८, उस्मानाबाद-४२८, लातूर-४०८, बीड-१२९, औरंगाबाद-६१८, जालना-४७५, परभणी-५६६, हिंगोली-४९५, नांदेड-१०१५, बुलढाणा-५२७, अकोला-२२५, अमरावती-५५३, यवतमाळ-९८०, वाशीम-१६३, वर्धा-५०, नागपूर-१३०, भंडारा-१४८, चंद्रपूर-६२९, गडचिरोली-३६२, गोंदिया-१८९  इतक्या ग्रामपंचायती निवडणुकांना सामोऱ्या जाणार आहेत.

National Stock Exchange
spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

News Danka Samarpan Parv
Star Housing Finance Limited

आम्हाला follow करा

113,459चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
285,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा