मुंबई महानगरपालिका निवडणूक २०२६च्या पार्श्वभूमीवर महायुतीचा प्रचार वेग घेत असताना, या प्रचारात आता बिहारच्या आमदार व प्रसिद्ध लोकगायिका मैथिली ठाकूर सहभागी झाल्या आहेत. त्यांनी मुंबईतील विविध भागांत रोड शो आणि प्रचार फेऱ्या काढत महायुतीच्या उमेदवारांना पाठिंबा देण्याचे आवाहन केले. प्रचारादरम्यान माध्यमांशी संवाद साधताना मैथिली ठाकूर यांनी सांगितले की, मुंबई महानगरपालिकेचा महापौर महायुतीचाच होईल, असा त्यांना पूर्ण विश्वास आहे. मुंबई ही संधी, कष्ट आणि विकासाचे प्रतीक असलेली नगरी असून, या शहराचा सर्वांगीण विकास करण्याची क्षमता महायुतीकडेच आहे, असे मत त्यांनी व्यक्त केले.
प्रचार फेरीदरम्यान त्यांनी आपल्या खास शैलीत लोकगीतांचे सादरीकरण केले. हिंदी आणि मैथिली भाषेसोबतच त्यांनी मराठी भाषेतही नागरिकांशी संवाद साधण्याचा प्रयत्न केला. त्यांच्या या वेगळ्या आणि लोकाभिमुख प्रचारपद्धतीमुळे अनेक ठिकाणी नागरिकांची मोठी गर्दी पाहायला मिळाली.
हे ही वाचा:
केंद्र सरकारच्या धोरणांच्या महिलांच्या नेतृत्वाखालील विकास
ज्योतिरादित्य सिंधिया यांची जबरदस्त घोषणा
मुंबईला बांग्लादेशी व रोहिंग्यामुक्त करणार
सोमनाथ स्वाभिमान पर्वाच्या निमित्ताने शौर्य यात्रा, आकाशात उमटल्या डमरू, त्रिशूळाच्या प्रतिमा
मैथिली ठाकूर या लोकप्रिय लोकगायिका म्हणूनही ओळखल्या जातात. पारंपरिक लोकसंगीत, भजन आणि सांस्कृतिक कार्यक्रमांमधून त्यांनी मोठी ओळख निर्माण केली आहे. मैथिली ठाकूर या तरुणांमध्ये विशेष लोकप्रिय असून, त्यांनी बिहारमधून विधानसभेची निवडणूक लढवत सक्रिय राजकारणात सहभाग घेतला होता.
दरम्यान महायुतीच्या नेत्यांनी यावेळी सांगितले की, विविध राज्यांतील लोकप्रिय व्यक्ती प्रचारात सहभागी होत असल्याने पक्षाला मोठ्या प्रमाणात जनसमर्थन मिळत आहे. मुंबईसारख्या महानगरात स्थानिक मुद्द्यांसोबतच राष्ट्रीय पातळीवरील विश्वासही महत्त्वाचा ठरत असून, त्याचा फायदा महायुतीला होईल, असा विश्वास व्यक्त करण्यात आला.







