पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकांची सध्या भारतभर चर्चा आहे. पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांचा गड भेदून तिथे आपली सत्ता प्रस्थपित करण्याचा भारतीय जनता पार्टीने चंग बांधला आहे. भाजपाच्या आक्रमक प्रचारापुढे पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी या बावचळलेल्या दिसत आहे. ममता बॅनर्जी नंदीग्राम मधून विधानसभेच्या रिंगणात उतरल्या आहेत. पराभवाच्या भीतीने ममता बॅनर्जी यांनी भाजपाच्या कार्यकर्त्यांना प्रलोभन दाखवून फितवण्याचा प्रयत्न केला असा आरोप केला जात आहे.
शनिवार २७ मार्च रोजी पश्चिम बंगाल निवडणुकांचा पाहिला टप्पा पार पडत आहे. या पहिल्या टप्प्यात पश्चिम बंगालच्या एकूण २९४ जागांच्या विधानसभेपैकी ३० जागांसाठी मतदान होणार आहे. मतदानाला बंगाली मतदारांकडून भरभरून प्रतिसाद मिळताना दिसत असुन दुपारी ३ वाजेपर्यंत ७०% मतदान नोंदवण्यात आले आहे. एकीकडे हे मतदान सुरु असताना ममता बॅनर्जींचे तृणमूल काँग्रेस पक्ष आणि भारतीय जनता पार्टी एकमेकांवर आरोपांच्या फैरी झाडताना दिसत आहेत.
शनिवारी सकाळी पाऊणे बाराच्या सुमारास बंगाल भाजपाच्या ट्विटर हॅण्डलवरून एक ट्विट करण्यात आले. या ट्विटमध्ये एक व्हिडीओ पोस्ट करण्यात आला आहे. बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी भाजपाच्या जिल्हा उपाध्यक्षांना कॉल करून नंदीग्राम मध्ये निवडणूक जिंकण्यासाठी विनवण्या करत असल्याचा आरोप या व्हिडिओसोबत केला आहे. प्रलय पाल असे या भाजपा जिल्हा उपाध्यक्षाचे नाव आहे.
Mamata Didi called BJP district Vice-president and pleaded for help in Nandigram.
Pishi is definitely losing Nandigram, her fear is evident enough in the call! pic.twitter.com/8XKN0v8b9C
— BJP Bengal (@BJP4Bengal) March 27, 2021
हे ही वाचा:
सीएएसाठी भाषण करणारे मनमोहन आता त्याचा विरोध करतात; हाच काँग्रेसचा खरा चेहरा
बांग्लादेशमधील हिंदू भाविकांना मोदी सरकारची अनोखी भेट
कोविडपासून लसीची सुरक्षा लहानग्यांनाही मिळणार?
काय आहे हे संभाषण?
ममता बॅनर्जी: तू एक होतकरू तरुण आहेस. तू खूप काम करतोस हे मला माहित आहे. कृपया या क्षेत्रात आम्हाला थोडी मदत कर. तुला कोणत्याही प्रकारचा त्रास होणार नाही.
प्रलय पाल: दीदी माझं कुटुंब राजकारणात तुमच्यामुळे आले. जेव्हा निवडुणूकांचे निकाल लागले आणि तुम्ही मुख्यमंत्री होणार हे समजले, तेव्हा आम्ही ५ ब्राह्मणांना बोलवून घरी पूजा घातली होती आणि मिरवणूक काढली होती. पण त्रास याचा होतो की एवढे सगळे त्याग करूनही आम्हाला साधे नागरिकता प्रमाणपत्र मिळत नाही. हे खूप अपमानास्पद आहे.
ममता बॅनर्जी: पण मला नंदीग्राम मधल्या स्थानिक तृणमूल नेतृत्वाने (सुवेंदू अधिकारी) नंदीग्राम मध्ये येण्यास मज्जाव केला होता.
प्रलय पाल: पण मला साधे नागरिकतेचे प्रमाणपत्र मिळत नाही हे कसे शक्य आहे? तुमच्या महादेवने (तृणमूल कार्यकर्ता) तर माझ्यावर हल्ला केला.
ममता बॅनर्जी: या बद्दल मला माहितीच नव्हते. आत्ताच मला याविषयीची माहिती मिळत आहे.
प्रलय पाल: दीदी तुमचे काहीही म्हणणे असले तरी मी आता तृणमूल पक्ष सोडला आहे आणि मी सध्या ज्या पक्षात आहे त्यांचा विश्वास मी नाही मोडू शकत.
ममता बॅनर्जी: तू आता ज्या पक्षात आहेत तिथले लोक प्रामाणिक आहेत असे तुला वाटते का?
प्रलय पाल: हो ते प्रामाणिक असल्याची मला खात्री आहे आणि भाजपा जोपर्यंत योग्य पथावर आहे तोपर्यंत मी भाजपासाठी काम करत राहीन. अधिकारी परिवार गेले अनेक वर्ष माझ्या पाठीशी उभा आहे. त्यांचा आणि माझा ४० वर्षांचा स्नेह आहे. मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाने जेव्हा माझ्यावर अत्याचार केले तेव्हाही अधिकारी माझ्यासोबत खंबीरपणे उभे होते. तुम्ही एवढ्या मोठ्या राजकारणी असून मला फोन केलात याचा मला आनंद आहे. पण मला माफ करा.
ममता बॅनर्जी आणि प्रलय पाल यांच्या संभाषणाची ही ध्वनिफीत बनावट असल्याचा दावा तृणमूल काँग्रेस पक्षाकडून केला जात आहे. पण प्रलय पाल याने हे संभाषण खरे असल्याचे म्हटले आहे. या संदर्भात प्रलय पाल याने इंडिया टुडे वाहिनीला प्रतिक्रिया दिली आहे. ऑप इंडियाने या संबंधीचे वृत्त दिले आहे.







