30.7 C
Mumbai
Friday, October 23, 2026
घरराजकारणनंदिग्राममध्ये ममता बॅनर्जी पिछाडीवर

नंदिग्राममध्ये ममता बॅनर्जी पिछाडीवर

Google News Follow

गेल्या महिनाभरापासून संपूर्ण देशाचे लक्ष लागून राहिलेल्या पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीचा निकाल रविवारी जाहीर होत आहे. त्यामुळे या निवडणुकीत ममतांचा तृणमूल काँग्रेस की पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा भाजपा, यापैकी कोण बाजी मारणार, याचा फैसला होईल. कोणत्याही परिस्थितीत पश्चिम बंगालमध्ये सत्ता स्थापन करायचीच, या इर्षेने भाजपाने आपली संपूर्ण प्रचारयंत्रणा या निवडणुकीत उतरवली होती. तर अस्तित्त्वाची लढाई लढत असलेल्या ममता बॅनर्जी यादेखील चवताळून भाजपाशी दोन हात करण्यासाठी ठामपणे उभ्या ठाकल्या होत्या.

नंदीग्राममधील कल हे सध्या ममता बॅनर्जींना पिछाडीवर दाखवत आहेत. तर भाजपाच्या सुवेंदू अधिकारी यांनी मोठी आघाडी घेतल्याचं चित्र दिसत आहे.

विधानसभेच्या २९४ जागांसाठी पश्चिम बंगालमध्ये आठ टप्प्यांत मतदान झाले होते. सत्तेच्या सिंहासनावर बसण्यासाठी १४८ ही मॅजिक फिगर आहे. त्यामुळे कोणता पक्ष बहुमताच्या या आकड्यापर्यंत पोहोचणार याकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत.

हे ही वाचा:

निवडणूक निकालांच्या आधीच काँग्रेसने काढला पळ

डंका बजने लगा

२८ वर्षीय ऋग्वेद कुलकर्णीचे कोरोनामुळे निधन

जल्दी लगा दे सुई…

पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीत सध्या कोणत्या नेत्याची सर्वाधिक चर्चा होत असेल तर ते आहेत सुवेंदू अधिकारी. सुवेंदू अधिकारींनी काही दिवसांआधीच तृणमूल काँग्रेसला सोडचिट्ठी देऊन भाजपात प्रवेश केला. ममता बॅनर्जींसोबत नंदीग्राम आंदोलनात मुख्य भूमिका घेणारे सुवेंदू अधिकारी आता ममता बॅनर्जींच्याविरोधात निवडणुकीत उतरले आहेत. नगरसेवक, नगराध्यक्ष, आमदार आणि खासदार राहिलेले अधिकारी यांचा जंगल महल परिसरात मोठ्या प्रमाणात प्रभाव आहे. राजकीय परिवाराशी संबंधित असलेले शुभेंदु अधिकारी हे ममता बॅनर्जी यांच्या सरकारमध्ये विविध विभागांचे मंत्री होते. त्यांचे वडील शिशिर अधिकारी हे सुद्धा राजकारण आहेत. शिवाय दिब्येंदु अधिकारी हे सुद्धा राजकारणात आहेत.

National Stock Exchange
spot_img

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

113,459चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
339,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा