ऑपरेशन सिंदूर नंतर काँग्रेसमध्ये दुफळी माजली आहे. या यशस्वी मोहिमेनेनंतर भारताने खासदारांची पथके विविध देशात पाठवली त्यात सहभागी झालेले शशी थरूर, मनीष तिवारी या काँग्रेसच्या खासदारांची तोंडे आता काँग्रेसने बंद केली आहेत.
काँग्रेस खासदार मनीष तिवारी यांनी संसदेत “ऑपरेशन सिंदूर” संदर्भातील चर्चेसाठी स्वतः व शशी थरूर यांना वगळल्याच्या निर्णयावर पक्षावर सूचक टोला हाणला आहे. दोघेही परराष्ट्र दौऱ्यावर भारत सरकारच्या सर्वपक्षीय प्रतिनिधिमंडळाचा भाग होते, ज्यात त्यांनी पाकिस्तानवर दहशतवादाला पाठींबा देत असल्याबद्दल आंतरराष्ट्रीय स्तरावर दबाव निर्माण केला होता.
मूळ मुद्दा काय?
- काँग्रेसने या चर्चेसाठी मनीष तिवारी व शशी थरूर यांना बोलण्याची संधी दिली नाही, हे दोघेही पक्षातील प्रभावी आणि कुशल वक्ते मानले जातात. त्यामुळे पक्षाच्या अंतर्गत असलेली नाराजी आणि मतभेद चव्हाट्यावर आले आहेत.
मनीष तिवारी यांची प्रतिक्रिया
तिवारींनी एका वृत्तसंस्थेचा स्क्रीनशॉट शेअर करत आपली नाराजी व्यक्त केली. त्यांनी ‘पूरब और पश्चिम’ या १९७० मधील देशभक्तीपर चित्रपटातील प्रसिद्ध गण्याच्या ओळी शेअर केल्या:
“है प्रीत जहां की रीत सदा, मैं गीत वहां के गाता हूं, भारत का रहने वाला हूं, भारत की बात सुनाता हूं। जय हिंद”
हे ही वाचा:
मेघालयात ४,००० टन कोळसा गायब, मंत्री म्हणाले- पावसात वाहून गेला!
निमिषा प्रियाची येमेनमधील फाशी रद्द झाल्याचा दावा चुकीचा!
भारतीय वंशाचे शैलेश जेजुरीकर यांची प्रॉक्टर अँड गॅम्बलचे सीईओ म्हणून नियुक्ती
२२ एप्रिल ते १७ जून दरम्यान पंतप्रधान-ट्रम्प यांच्यात फोनवर चर्चा नाही!
चर्चेत सहभागी होण्याची मागणी
सूत्रांच्या माहितीनुसार, मनीष तिवारी यांनी विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांच्या कार्यालयाला ईमेल लिहून चर्चेत सहभागी होण्याची इच्छा व्यक्त केली होती. मात्र, काँग्रेसने त्यांना संधी दिली नाही. यामुळे नाराजी उघड झाली.
शशी थरूर यांनी संधी नाकारली:
काँग्रेसने शशी थरूर यांना बोलण्याची विनंती केली होती, परंतु त्यांनी ती नाकारली. कारण, थरूर यांनी स्पष्ट केलं की परदेश दौऱ्यांदरम्यान त्यांनी ऑपरेशन सिंदूर यशस्वी ठरल्याचे मान्य केले होते आणि आता त्या भूमिकेपासून विचलित होणे शक्य नाही. पत्रकारांनी विचारल्यावर, थरूर यांनी “मौन व्रतावर आहे” असे म्हणत पक्षावर सूचक कटाक्ष केला.
इतर नेत्यांनाही संधी नाही:
काँग्रेस खासदार अमर सिंह, जे प्रतिनिधिमंडळाचा भाग होते, त्यांनाही चर्चेत बोलण्याची संधी मिळाली नाही.







