34 C
Mumbai
Thursday, October 29, 2026
घरराजकारणमराठा विद्यार्थ्यांच्या मंत्रालयात गराडा

मराठा विद्यार्थ्यांच्या मंत्रालयात गराडा

Google News Follow

सरकारने दिलेले आश्वासन पाळलेलं नाही, असा आरोप करत याविरोधात मराठा क्रांती मोर्चाचे समन्वयक आणि विद्यार्थ्यांनी मंत्रालयात ठिय्या आंदोलन सुरु केले. जोपर्यंत आम्हाला भेटण्यासाठी मुख्यमंत्री येणार नाहीत तोपर्यंत आम्ही इथून उठणार नाही, असा पवित्रा यांनी घेतला. त्यानंतर पोलिसांनी समन्वयक आणि विद्यार्थ्यांना ताब्यात घेतले आहे.

काही दिवसांपूर्वी मराठा समाजाच्या मागण्यांसाठी खासदार संभाजीराजे उपोषणाला बसले होते. यामध्ये मराठा समाजाच्या एकूण १८ मागण्या होत्या. त्यांनतर मराठा समाजाच्या काही मागण्या सरकारने मान्य केल्यानंतर संभाजीराजे यांनी उपोषण मागे घेतले होते. उरलेल्या मागण्या मान्य करण्यात येणार असल्याचे लेखी आश्वासन देत सरकारने त्यांना उपोषण सोडण्यास भाग पाडले. त्यानंतर सुमारे दीड महिन्यानंतरही अद्याप या मागण्या मान्य होऊनही त्याची दिलेल्या वेळेत पूर्तता झालेली नाही.

एका आजीला भेटण्यास मुख्यमंत्री जातात,पण मराठा विद्यार्थ्यांना मुख्यमंत्री भेटत नाहीत, अशी भूमिका मराठा क्रांती मोर्चाचे समन्वयक आणि विद्यार्थ्यांनी घेतली आहे. काही अधिकारी जाणीवपूर्वक मराठा समाजाचा घात करत आहेत. मुख्यमंत्र्यांच्या बैठकीत ठरले असताना आता आमच्या मागणीवर विचार केला जात नाही आहे. जाणीवपूर्वक मराठा विद्यार्थ्यांना आत्महत्या करण्यास भाग पाडत आहेत. मुख्यमंत्री येत नाहीत तो पर्यंत इथून उठणार नाही अशी भूमिका, या विद्यार्थ्यांनी घेतली. मात्र काही वेळातच समन्वयक आणि विद्यार्थ्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

हे ही वाचा:

“जीएसटीची थकबाकी मिळाल्यानंतर आता आकारत असलेला अतिरिक्त कर परत करणार का?”

“कुख्यात युसुफ लकडावाला प्रकरणी पवारांची चौकशी होणार काय?”

“जीएसटीची थकबाकी मिळाल्यानंतर आता आकारत असलेला अतिरिक्त कर परत करणार का?”

भारताचे फ्रान्स फॉलोइंग

दरम्यान, ज्यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन सुरु आहे ते अंकुश कदम म्हणाले, सरकारचे काही जातीयवादी अधिकारी मराठा समाजाचा घात करण्याच काम जाणीवपूर्वक करत आहेत. आज गरज नसताना या अधिकाऱ्यांनी तोंडी मत मागवले असून हे अधिकारी आमच्या मागण्या धुडकावत आहेत.

National Stock Exchange
spot_img

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

113,459चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
340,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा