28.9 C
Mumbai
Friday, April 19, 2024
घरक्राईमनामाधक्कादायक! राज्यमंत्र्यांच्याच कॉलेजमध्ये मुलं पुस्तकात बघून लिहितायत उत्तरं

धक्कादायक! राज्यमंत्र्यांच्याच कॉलेजमध्ये मुलं पुस्तकात बघून लिहितायत उत्तरं

Google News Follow

Related

कोरोना महामारीचा प्रादुर्भाव कमी होताच परीक्षा ऑफलाईन सुरू झालेल्या असताना शाळा महाविद्यालयांमध्ये कॉपी करण्याचे प्रकार कमी होताना दिसत नाहीत. औरंगाबाद जिल्ह्यातील फरदापुर मध्ये राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांच्या नॅशनल कॉलेजमध्ये मास कॉपीचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या प्रकाराचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाली आहे.

राज्याच्या शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी विधानसभेत परीक्षेदरम्यान कॉपी करताना जर कोणी आढळले, तर त्या शाळेची मान्यता रद्द करण्यात येईल असा इशारा त्यांनी दिला असतानाही असे प्रकार घडत असल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे.

फरदापुर येथील राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांच्या नॅशनल कॉलेजमध्ये सध्या बारावीची परीक्षा सुरू आहे. दरम्यान, मंगळवारी हिंदीचा पेपर सुरू असताना विद्यार्थ्यांकडून चक्क मास कॉपी केली जात होती. महाविद्यालयात परीक्षार्थी थेट बाकावर पुस्तकाची पाने ठेवूनच उत्तरे लिहीत आहेत. दरम्यान कॉलेजच्या खिडकीच्या बाहेर असंख्य कॉप्यांचा खच पडलेला देखील पाहायला मिळाला, हे सर्व व्हिडीओमध्ये कैद झालेले आहे.

हे ही वाचा:

RRR १००० कोटींच्या उंबरठ्यावर! PK ला मागे टाकत रचला ‘हा’ विक्रम

अनिल देशमुखांना सीबीआयने घेतलं ताब्यात

‘काही लोकांचा नखं कापून शहीद होण्याचा प्रयत्न’

माननीय बाळासाहेब, जमल्यास उद्धवजींना हिंदूंबाबत सुबुद्धी द्या

यानंतर आता राज्यमंत्र्यांच्याच महाविद्यालयात सुरू असलेला कॉपीचा प्रकार पाहून शिक्षणमंत्री काय कारवाई करणार असे प्रश्न उपस्थित केले जात आहेत. भाजपा नेते आणि आमदार अतुल भातखळकर यांनी हा व्हिडीओ शेअर करत ठाकरे सरकारवर टीका केली आहे. सरकार रंगलय लफड्यात, असे म्हणत अतुल भातखळकर यांनी महाविकास आघडी सरकारवर निशाणा साधला आहे.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
147,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा