34 C
Mumbai
Wednesday, October 27, 2021
घरराजकारणराष्ट्रवादीचे आमदार नवघरे शिवाजी महाराजांच्या घोड्यावरच उभे राहिले!

राष्ट्रवादीचे आमदार नवघरे शिवाजी महाराजांच्या घोड्यावरच उभे राहिले!

Related

वसमत विधानसभेचे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आमदार राजू नवघरे बुधवारी घोड्यावर स्वार झाले. यात बातमी काय असे वाटेल, पण वसमत येथे छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा बसविण्यात येणार होता. त्या पुतळ्यावर हार घालताना आमदार नवघरे हे चक्क घोड्यावरच उभे राहिले. तो व्हीडिओ चांगलाच व्हायरल झाला आहे.

शिवाजी महाराजांच्या नावाने राजकारण करणाऱ्या पक्षातील आमदाराने अशा पद्धतीने शिवाजी महाराजांचा अपमान केल्यामुळे महाराष्ट्रात नाराजीचे वातावरण आहे.

त्याआधी, नवघरे यांनी शिवाजी महाराजांच्या वसमतमध्ये बसविण्यात येणाऱ्या पुतळ्याविषयी व्हीडिओ बनविला होता. त्यात शिवप्रेमींच्या मागणीवरून आपण वसमतमध्ये शिवाजी महाराजांचा पुतळा बसवत आहोत, असे विधान केले होते. त्या व्हीडिओत ते म्हणतात की, आपण शिवाजी महाराजांच्या प्रेमाखातर हा पुतळा बसवत आहोत, सगळ्यांनी सकाळी १० वाजता तिथे जमून शिवछत्रपतींचा जयजयकार करायचा आहे. मात्र ते करताना जोश आणि होश असे दोन्ही सांभाळायचे आहे. मात्र स्वतः नवघरे मात्र ‘होश’ गमावून बसले आणि शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला हार घालण्यासाठी थेट घोड्यावरच स्वार झाले.

 

हे ही वाचा:

राजस्थानमधील काँग्रेसचे मंत्री म्हणाले, महिला कर्मचारी म्हणजे डोकेदुखी!

अजित पवारांना उपमुख्यमंत्रीपदी राहण्याचा अधिकार नाही

राज्यातील महाविद्यालये सुरू होण्यास सापडला मुहूर्त

आंतरराष्ट्रीय ड्रग बाजाराशी आर्यन खानचा संबंध?

 

हार घालताना फोटो काढण्यासाठी बराच वेळ ते घोड्यावर उभे होते. नंतर खाली उतरताना मात्र ते चांगलेच गोंधळात सापडले. कसे उतरावे हे त्यांना कळत नव्हते. पण शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला हार घालण्याच्या नादात आपण घोड्यावरच स्वार झालो आहोत, याचे भान त्यांना राहिले नाही.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

आम्हाला follow करा

2,721चाहतेआवड दर्शवा
1,446अनुयायीअनुकरण करा
4,450सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा