मोदीची कब्र तुम्ही खोदू शकणार नाही; माझ्याकडे आहे, जनतेच्या आशीर्वादाचे कवच

पंतप्रधान राज्यसभेत गरजले

मोदीची कब्र तुम्ही खोदू शकणार नाही; माझ्याकडे आहे, जनतेच्या आशीर्वादाचे कवच

भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राज्यसभेत गुरुवारी केलेल्या भाषणातून काँग्रेसने गेली २५वर्षे केलेल्या त्यांच्या द्वेषाला जबरदस्त चपराक लगावली. गांधी कुटुंब आणि काँग्रेसकडून आपला संसदेत सातत्याने उद्धार करण्यात आला तो कशासाठी याचे उत्तर मोदींनी आपल्या भाषणातून दिले.

लोकसभेत बुधवारी त्यांना विरोधकांनी भाषण करू दिले नाही. देशाच्या इतिहासात प्रथमच राष्ट्रपतींच्या अभिभाषणावर पंतप्रधानांना भाषण करू दिले गेले नाही. लोकसभेत विरोधकांनी प्रचंड गोंधळ घातला. मात्र गुरुवारी मोदींनी राज्यसभेत भाषण केले. तेव्हा सगळे विरोधक आधीच सभात्याग करून निघून गेले होते. काँग्रेस आणि गांधी कुटुंबाकडून कसा द्वेष सुरू आहे, याचे दाखले मोदींनी आपल्या भाषणात दिले.

ते म्हणाले की, मोदींची कब्र हे लोक का खोदू इच्छितात कारण त्यांच्या मनात द्वेष आहे. आम्ही ३७० ची भिंत पाडली म्हणून कब्र खोदू इच्छितात. आम्ही इशान्य भारतात बंदूक बॉम्ब हटवून विकासाचा मार्ग अवलंबला म्हणून ते कब्र खोदू पाहात आहेत. पाकिस्तानाच्या घरात घुसून आम्ही मारतो, म्हणून माझी कब्र खोदायची आहे. आम्ही ऑपरेशन सिंदूर करतो त्याचा त्यांचा अडथळा वाचतो म्हणून ते कब्र खोदू इच्छितात. माओवाद्यांपासून मुक्ती देतो म्हणून ते कब्र खोदू इच्छितात मोदींची? नेहरूंनी देशाशी मोठा अन्याय केला. त्यांनी पाकिस्तानशी  सिंधूजल करार केला.  रद्द केला म्हणून मोदींची कब्र खोदण्याच्या घोषणा देता. काँग्रेसची अडचण वेगळी आहे ते पचवू शकत नाहीत की मोदी इथे पोहोचले कसे. म्हणून ते मोदी तेरी कब्र खुदेगी म्हणतात.

मोदी म्हणाले की, त्यांचे लोकशाही, संविधान याच्याशी काही देणेघेणे नाही. काँग्रेसच्या शाही परिवाराला देशाने दशकांपर्यंत संधी दिली. पण तुम्ही गरिबी हटाओ च्या घोषणा दिल्या, लाल किल्ल्यावरून पंतप्रधानांच्या भाषणातून गरिबी हटाओच्या घोषणा दिल्या पण त्यापलिकडे काहीही केले नाही. मोदींनी गरीबांना सशक्त केले, गरिबांना मी सलाम करतो की त्यांनी देशाच्या योजनांना स्वीकारले, आपले सामर्थ्य वाढवले. गरिबांचे मी कौतुक करतो आमच्या धोरणावर भरवसा ठेवला त्यांनीही मेहनत घेतले. २५ कोटी भआरतीयांनी गरिबीला नमवलि आणि त्यातून ते बाहेर आले. त्यांना माझा सलाम.

मोदींनी सांगितले की, रेल्वे क्राँसिंगवर लोक मरत असतं. फाटक नव्हते पण हे कामही मलाच करावं लागलं. सगळी क्राँसिंग बंद केली. अनेकांचे जीव वाचवले. म्हणून ते माझी कब्र खोदू इच्छितात. लोकांना वीज म्हणजे काय हे देखील माहीत नव्हते. १८ हजार गाव २०१४ पर्यंत वीजेशिवाय होती, आमचे सरकार आल्यावर तिथे वीज पोहोचली. ते यांना बघवत नाही म्हणून माझी कब्र खुदेगी.

हे ही वाचा:

पाकिस्तान सीमेवर पुन्हा गरजणार भारतीय हवाईदल

तिरुवनंतपुरमच्या भाजप नगरसेवकांसाठी पंतप्रधान मोदींकडून ‘मेजवानी’

४२ वर्षांनंतर मिळाला न्याय; हत्येच्या आरोपाखाली दोषी १०० वर्षीय व्यक्तीची निर्दोष मुक्तता

‘सौदी अरेबियात व्यावसायिक प्रदर्शनात हिंदू व्यावसायिकावर धर्मावरून डिवचले?’

भारतीय सैन्याकडे दारुगोळा नसे, बुलेटप्रूफ जॅकेट नव्हते, बर्फातील बूट नव्हते आम्ही देशातील जवानांसाठी खजिना उघडला. म्हणून या घोषणा दिल्या जात आहेत… मोदी की कब्र खुदेगी.

संवेदनशीलता, समाजासाठी जगण्याचा हा आमचा संकल्प आहे. क्षण क्षण, तीळ तीळ समाजासाठी जगणं हेच आमचं तत्त्व आहे. हे त्यांना डाचत आहे म्हणून मोदी तेरी कब्र खुदेगीचं स्वप्न ते पाहात आहेत. मोहब्बत की दुकानाचे बोर्ड लावतात. यांचे सरकार रिमोटवर चालते. माझे सरकारही रिमोटवर चालते पण १४० देशवासी माझा रिमोट आहेत. त्यांची स्वप्ने, आकांक्षा, नवयुवकांचे संकल्प यांच्यासाठी आम्ही सरकार चालवतो. आमच्यासाठी सत्ता  हा सुखाचा मार्ग नाही. सेवेचे माध्यम आहे. काँग्रेसने कधीही स्टार्टअप कल्चरला प्रोत्साहन दिले नाही. त्यांचे हाल हे आहेत की आपल्या घराच्या स्टार्टअपलाही ते लिफ्ट करू शकले नाहीत. आज देशात २ लाखांपेक्षा अधिक स्टार्टअप आहेत. म्हणूनच ते म्हणत आहेत,  मोदी तेरी कब्र खुदेगी.

गरीबांची सेवा हे माझे सौभाग्य आहे. ४ कोटी गरिबांना घरे देण्यातून मला सुख मिळते. परमात्म्याने मला योग्य दिशेने काम करण्याची प्रेरणा दिली. लखपती दीदी आज करोडपती होण्यासाठी प्रयत्न करत आहेत. कोटी कोटी देशवासियांचे आशीर्वाद माझ्या पाठीशी आहेत.त्यामुळे तुम्ही कधीही माझी कब्र खोदू शकणार नाहीत. जनतेचे आशीर्वाद रूपी कवच माझ्याकडे आहे.

Exit mobile version