29.7 C
Mumbai
Sunday, June 28, 2026
घरक्राईमनामा४० फूट उंच क्रेनवर व्हॅन, फटाक्यांची आतषबाजी; शोएब खान ताब्यात

४० फूट उंच क्रेनवर व्हॅन, फटाक्यांची आतषबाजी; शोएब खान ताब्यात

उज्जैनच्या बडनगर येथे मोहरम मिरवणुकीदरम्यान जीवघेणा स्टंट

Google News Follow

Related

मध्य प्रदेशातील उज्जैन जिल्ह्यातील बडनगर येथे मोहरम मिरवणुकीदरम्यान जीवघेणा स्टंट केल्याप्रकरणी पोलिसांनी चार जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. क्रेनच्या साहाय्याने सुमारे ४० फूट उंचीवर एक व्हॅन हवेत लटकवून तिच्या आत फटाके फोडण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला. या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर पोलिसांनी तातडीने कारवाई करत मुख्य आरोपी शोएब खानसह अन्य आरोपींवर गुन्हा दाखल केला आहे.

ही घटना २४ जून रोजी बडनगर शहरातील आदान परिसरात मोहरम मिरवणुकीदरम्यान घडली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मिरवणूक सुरू असताना एका क्रेनच्या सहाय्याने “ले फिर आ गए” असे लिहिलेली व्हॅन सुमारे ४० फूट उंच हवेत उचलण्यात आली. त्यानंतर व्हॅनच्या आत आधीच ठेवण्यात आलेल्या फटाक्यांना आग लावण्यात आली. काही क्षणांतच व्हॅनमधून मोठ्या आवाजात स्फोटासारखा आवाज झाला, धूर आणि ठिणग्या बाहेर पडू लागल्या तसेच वाहनाच्या काचा फुटल्या. यामुळे उपस्थित नागरिकांमध्ये एकच खळबळ उडाली.

व्हिडीओमध्ये दोन युवक हवेत लटकलेल्या व्हॅनवर उभे राहून लाल झेंडे फडकावत असल्याचे दिसत आहे. पोलिसांच्या प्राथमिक तपासानुसार, हा स्टंट मोठी गर्दी जमवण्यासाठी आणि सोशल मीडियावर प्रसिद्धी मिळवण्यासाठी करण्यात आला होता. घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाल्यानंतर मध्य प्रदेश पोलिसांनी तत्काळ दखल घेत कारवाई सुरू केली.

या प्रकरणात आयोजक शोएब खान, तालीम खान, जाहिद खान तसेच क्रेन मालक गोपाल माळी यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. स्टंटदरम्यान शोएब खान, तालीम खान आणि जाहिद खान हे तिघेही हवेत लटकलेल्या वाहनावर उपस्थित होते, असा आरोप पोलिसांनी केला आहे. या प्रकरणी भारतीय न्याय संहितेच्या कलम १२५, २८५, २८६ आणि २८७ अंतर्गत गुन्हा नोंदविण्यात आला आहे. पोलिसांनी सांगितले की, या चार आरोपींशिवाय इतर काही जणांचाही तपास सुरू असून त्यांच्याविरुद्धही कारवाई केली जाणार आहे.

हे ही वाचा:

पंतप्रधान मोदींच्या सेशेल्स दौऱ्यात ‘या’ क्षेत्रांतील सहकार्य होणार मजबूत

व्हेनेझुएलाच्या मदतीसाठी भारताचे ‘ऑपरेशन अमिस्ताद’

ऑपरेशन सिंदूरमधील सहा हुतात्म्यांची नावे प्रथमच जाहीर

राम मंदिर देणगी गैरव्यवहार प्रकरणानंतर चंपत राय यांचा राजीनामा

पोलिसांनी स्पष्ट केले की, मोहरम मिरवणूक काढण्यास प्रशासनाची परवानगी देण्यात आली होती. मात्र, क्रेनच्या साहाय्याने वाहन हवेत उचलणे किंवा त्यामध्ये फटाके फोडण्यास कोणतीही परवानगी देण्यात आलेली नव्हती. त्यामुळे हा प्रकार निष्काळजीपणा आणि सार्वजनिक सुरक्षेला धोका निर्माण करणारा असल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे. उज्जैनचे अतिरिक्त पोलीस अधीक्षक करणदीप सिंह यांनी सांगितले की, व्हायरल झालेल्या व्हिडीओची दखल घेत मुख्य आयोजक शोएब खानला ताब्यात घेण्यात आले आहे. व्हिडीओमध्ये दिसणाऱ्या आणखी दोघांनाही अटक करण्यात आली असून इतर संबंधितांची ओळख पटवून त्यांच्याविरुद्धही कायदेशीर कारवाई सुरू आहे.

National Stock Exchange
spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

News Danka Samarpan Parv
Star Housing Finance Limited

आम्हाला follow करा

113,459चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
318,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा