राज्यात ऑपरेशन टायगरची कुणकुण लागताच शिवसेना उबाठातील खासदारांची बातमी समोर आली आहे. या खासदारांना मातोश्रीवर बोलावण्यात आले असून त्यांची नाराजी दूर करण्याचा हा प्रयत्न आहे. ही नाराजी कशाबद्दल आहे, हे जाणून घेणयाचा आता उद्धव ठाकरे प्रयत्न करतील.
शिवसेना उबाठाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी पक्षातील सर्व खासदारांना मातोश्रीवर बोलावले आहे. पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंच्या कार्यपद्धतींवर हे खासदार नाराज असल्याचे कळते. त्यामुळेच उद्धव ठाकरे त्यांच्याशी बोलून त्यांच्या तक्रारींचे निराकरण करणार असल्याचे कळते.
ठाकरे गटाचे खासदार पक्षप्रमुख उद्धव ठाकरे व आदित्य ठाकरे यांच्या कार्यपद्धतीवर हे खासदार नाराज आहेत. दिल्लीतील संजय राऊत यांच्या घरी या खासदारांची बैठक झाली. तिथे या तक्रारीला तोंड फुटले. बैठकीत उद्धव ठाकरेंविरोधात सर्व खासदारांनी नाराजीचा सूर पाहायला मिळाला. खासदारांच्या नाराजीमुळे ॲापरेशन टायगरला बळ मिळू नये यासाठी तातडीची बैठक बोलावण्यात आली आहे. एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेच्या माध्यमातून हे ऑपरेशन टायगर राबविण्यात येत आहे. त्यातून उबाठातील नाराज खासदारांना आपल्याकडे खेचण्याचे प्रयत्न होत आहेत.
हे ही वाचा:
बोगदा खणणाऱ्या मशिन आल्या, बुलेट ट्रेनच्या कामाला वेग
₹२00 कोटींचा मिहान लॉजिस्टिक पार्क
सरकारचा मोठा निर्णय; कमर्शियल गॅस पुरवठ्यात ५०% वाढ
मोदींच्या ‘ऍक्ट ईस्ट पॉलिसी’चा गेमचेंजर: शिलाँग–सिलचर महामार्ग
काय वाटते खासदारांना?
संजय राऊत यांच्या दिल्लीतील घरी झालेल्या बैठकीत पक्षातील खासदारांनी पक्षश्रेष्ठींविरोधात तक्रारीचा पाढा वाचला. उद्धव ठाकरे खासदारांना भेटत नाहीत,स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत मदत केली नाही, उद्धव ठाकरे यांनी प्रचार केला नाही आदित्य ठाकरे सुद्धा महाराष्ट्रात फिरले नाहीत, अशा तक्रारी पक्षातील खासदारांनी केल्या तसेच उद्धव ठाकरेंचा संपर्क नसल्यामुळे चिंताही व्यक्त केली आहे.
दरम्यान, याबाबत बोलताना शिवसेना खासदार संजय राऊत यांनी मात्र महत्त्वाचे विधान केले आहे. विरोधी पक्षातील खासदारांना निधी मिळत नाही. सत्ताधाऱ्यांकडून निधी वाटपात भेदभाव केला जात आहे, अशी खासदारांची तक्रार असल्याचा आरोप संजय राऊत यांनी केला आहे. याचसंदर्भात आज उद्धवजींशी सर्व खासदार चर्चा करतील, असं ते म्हणाले.







