26 C
Mumbai
Thursday, January 29, 2026
घरराजकारणमुख्तार अब्बास नक्वी उपराष्ट्रपतीपदाच्या शर्यतीत?

मुख्तार अब्बास नक्वी उपराष्ट्रपतीपदाच्या शर्यतीत?

Google News Follow

Related

अल्पसंख्याक मंत्रीपदाचा दिला राजीनामा

केंद्रातील अल्पसंख्याक मंत्री मुख्तार अब्बास नक्वी यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिल आहे. मंत्रिमंडळाच्या बैठकीनंतर नक्वी यांनी भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा यांची भेट घेतली. राज्यसभा खासदार म्हणून त्यांचा कार्यकाळ गुरुवारी संपणार आहे. नक्वी यांनी राजीनामा दिला असला तरी ते उपराष्ट्रपतीपदाच्या शर्यतीत ते असल्याची चर्चा रंगली आहे.

नक्वी हे २०१० ते २०१६ या कालावधीत उत्तर प्रदेशातील राज्यसभा खासदार राहिले आहेत. २०१६मध्ये झारखंडमधून त्यांना राज्यसभेवर पाठविण्यात आले होते. १९९८मध्ये त्यांनी पहिल्यांदा लोकसभेची निवडणूक लढविली होती. २०१४मध्ये ते नरेंद्र मोदी यांच्या सरकारमध्ये अल्पसंख्याक मंत्री आणि संसदीय कार्यमंत्री होते. २०१६ला नजमा हेपतुल्ला यांनी राजीनामा दिल्यावर अल्पसंख्याक मंत्रालय नक्वी यांच्याकडे सोपविण्यात आले.

हे ही वाचा:

“शिवसेना म्हणून मान्यता मिळेल, संख्याबळाच्या जोरावर धनुष्यबाण चिन्हंही मिळेल”

शिवसेना खासदार भावना गवळींना लोकसभा प्रतोदपदावरून हटवले

‘नवं सरकार सर्वसामान्यांचं आहे’

आमदारांच्या उठावाला संजय राऊतचं जबाबदार

नक्वी यांच्याप्रमाणेच आरसीपी सिंह यांचा कार्यकाळ गुरुवारी संपणार आहे. जनता दल युनायटेडमधून आलेले आरसीपी सिंह यांनी गेल्या वर्षी मंत्रिपदाची शपथ घेतली होती. पण आरसीपी सिंह यांना राज्यसभा निवडणुकीसाठी पुन्हा संधी दिली गेली नाही.

उपराष्ट्रपतीपदासाठी नक्वी यांचे नाव असले तरी त्यासाठी केरळचे राज्यपाल आरीफ मोहम्मद खान यांच्या नावाचीही चर्चा आहे. त्यामुळे प्रत्यक्ष कुणाकडे हे सन्मानाचे पद येते ते पाहावे लागेल.

National Stock Exchange
spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

News Danka Samarpan Parv
Star Housing Finance Limited

आम्हाला follow करा

113,459चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
288,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा