33 C
Mumbai
Friday, April 10, 2026
घरराजकारणठाकरे सरकार जनतेच्या मानगुटीवर बसलेला कोरोना

ठाकरे सरकार जनतेच्या मानगुटीवर बसलेला कोरोना

Google News Follow

Related

विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी शिवसेनेचे मुख्य प्रवक्ते खासदार संजय राऊत यांच्यावर हल्ला चढवला आहे. संजय राऊत यांनी विरोधकांवर केलेल्या टीकेला प्रवीण दरेकर यांनी जोरदार प्रत्युत्तर दिले आहे. महाराष्ट्रातील शिवसेनेचे सरकारच जनतेच्या मानगुटीवर बसलेला करून आहे असे दरेकर यांनी म्हटले आहे.

देशात एकीकडे कोरोनाचा हाहाकार सुरू असताना त्याच कोरोनावरून तेवढ्याच मोठ्या प्रमाणात राजकारणही रंगलेले पाहायला मिळते. कोरोनाचा सर्वाधिक फटका महाराष्ट्राला बसला आहे आणि महाराष्ट्रातील सत्ताधारी महाविकास आघाडीचे नेतेही कोरोना हाताळण्यापेक्षा विरोधकांवर आरोपांच्या फैरी झाडताना दिसतो. शनिवार २२ मे रोजी अशाच प्रकारचे आरोप-प्रत्यारोप महाराष्ट्रात पाहायला मिळाले. शिवसेनेचे नेते खासदार संजय राऊत यांनी विरोधकांना ब्लॅक फंगस म्हणाले आणि त्यावरून विरोधक चांगलेच संतापले.

हे ही वाचा:

शर्जील उस्मानी विरोधात दिल्लीतही गुन्हा

लोकांच्या डोळ्यासमोर अंधार झाल्यानंतरच ठाकरे सरकारचे डोळे उघडणार आहेत का?

कोमट पाणी, कुजकट वाणी

अजित दादा, उद्धव ठाकरेंना सल्ला द्या

संजय राऊत यांच्या विधानाचा विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी चांगलाच समाचार घेतला आहे. ट्विटरच्या माध्यमातून दरेकर यांनी संजय लोकांवर निशाणा साधला आहे. दरेकर आपल्या ट्विटमध्ये म्हणतात, “श्रीमान संजय राऊत म्हणतात विरोधक ‘ब्लॅक फंगस’ आहेत!
पण, त्यांना हे ठाऊक नाही की हे अख्ख सरकारच जनतेच्या मानगुटीवर बसलेला कोरोना असून पक्ष तीन असले तरी यात कितीतरी विविध प्रकारचे ‘म्युटंट’ आहेत.” असे दरेकर म्हटले आहे.

तर त्यापुढे जाऊन दरेकर असे म्हणतात, “महाविकास आघाडी सरकारला केवळ भ्रष्टाचाराचा ‘ब्लॅक फंगस’ चिकटलेला नाही, तर राजरोस पोलिसी वसुलीच्या ‘व्हाईट फंगस’चाही रोग जडलेला आहे. जागतिक आरोग्य संघटनेच्या तज्ञ डॉक्टरांच्या ‘कंपाऊंडर’ला एवढेही ठाऊक नसावे ?
आश्चर्य आहे!”

National Stock Exchange
spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

News Danka Samarpan Parv
Star Housing Finance Limited

आम्हाला follow करा

113,459चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
302,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा