26 C
Mumbai
Tuesday, December 9, 2025
घरराजकारणटाटा एअरबस प्रकल्प नागपूरमध्ये होणार म्हणूनच मविआने आडकाठी आणली!

टाटा एअरबस प्रकल्प नागपूरमध्ये होणार म्हणूनच मविआने आडकाठी आणली!

महाविकास आघाडीने फेक नरेटिव्ह सेट केली.

Google News Follow

Related

महाराष्ट्रातून सगळे प्रकल्प कसे गुजरातला चालले आहेत, याविषयी सातत्याने महाविकास आघाडीचे नेते, उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे आदित्य ठाकरे आणि तत्कालिन उद्योगमंत्री सुभाष देसाई यांच्याकडून आरोप केले जात असताना महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री व भाजपा नेते देवेंद्र फडणवीस यांनी पत्रकार परिषद घेत सगळ्या आरोपांची चिरफाड केली. ते म्हणाले की, फॉक्सकॉन महाराष्ट्रात येणार नाही असे सुभाष देसाईच म्हणाले होते. ते उद्धव ठाकरे यांच्या काळात. मग त्यांनी भूमिका का घेतली की, या सरकारच्या काळात गेला. तुम्हीच स्टेटमेंट दिलेले आहे. पहिला फेक नरेटिव्ह फॉक्सकॉनचा तयार कऱण्यात आला. आमचे सरकार आले आणि फॉक्सकॉन गेले. अनेक वर्तमानपत्रात ते प्रसिद्ध करण्यात आले.

फडणवीस यांनी पुढे सांगितले की, टाटा एअरबस प्रकल्पाचेही तसेच. २३ सप्टेंबर २०२१ गुजरातमध्ये प्रकल्प होणार २२ हजार कोटींचे झाले डील. अशी बातमी होती. त्यानंतर १४ फेब्रुवारी २०२२ सरकार कुणाचे होते उद्धव ठाकरे यांचे. एअरबस टाटा प्रकल्प गुजरातमध्ये जाण्याची शक्यता, अशी बातमी आली होती. आम्ही विरोधी पक्षात गेलो म्हणजे राज्य विसरत नाही. २०१६ साली ज्यावेळी पहिल्यांदा टाटा एअरबसचे बोलणे सुरू झाले तेव्हा मी टाटांकडे गेलो. २०१९पर्यंत फॉलोअप केला. नागपूरला जागा दाखविली. गुजरातपेक्षा आम्ही जास्त देऊ असे आश्वासन दिले. २४ एप्रिल २०२१ या प्रकल्पाच्या प्रमुखांना घरी बोलावले सागर वर तुम्ही गुजरातला जाऊ नका, असे विरोधी पक्षनेता असतानाही मी म्हटले. तुमच्या अडचणींबाबत विरोधी पक्षनेता म्हणून ज्येष्ठ नेता म्हणून मुख्यमंत्र्यांकडे जाईन, अडचणी सोडवेन. त्यांचे शब्द होते की, इथला माहोल गुंतवणुकीसाठी योग्य नाही. तरीही ते म्हणाले की विचार करू.

एमआयडीसीचे सीईओना सांगितले की हा प्रकल्प चालला आहे. ती २०२१ची गोष्ट आहे. यांना थांबवा पण कारवाई झाली नाही. पत्रही गेले नाही. एक पत्र दाखवावं ओरडत आहेत त्यांनी. त्यानंतर एमओयू ठाकरेंच्या काळात झाला. त्यामुळे मविआ सरकार असताना टाटा एअरबस प्रकल्प महाराष्ट्रातून गेला आहे. कुठेतरी वाटते की, हा प्रकल्प नागपूरला करण्याचा प्रयत्न केला म्हणून जाणीवपूर्वक कारवाई केलेली नाही तत्कालिन सरकारने, असेही फडणवीस म्हणाले.

हा वाद सुरू झाल्यावर त्या कंपनीच्या प्रमुखांना फोन केला म्हटले की, तुम्ही स्पष्टीकरण का देत नाही. तुमचे, महाराष्ट्राचे नाव खराब होते त्यावेळी ते म्हणाले की, मी स्वतः मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना एक वर्षापूर्वी सांगितले होते की, गुजरातला जाण्याचा आमचा अंतिम निर्णय झालेला आहे. पण राजकारणात आम्हाला पडायचे नाही.  त्यामुळे सरकारला हे माहीत होते की टाटा एअरबस गुजरातला जाणार आहेत. तरी एक पत्र सरकारने लिहिलं नाही महाराष्ट्रात आणा हा प्रकल्प म्हणून.

हे ही वाचा:

पालिकेच्या ‘या’ गैरव्यवहारांची होणार चौकशी

वर्ल्डकपमध्ये चेतन शर्मा यांनी रचलेला इतिहास आठवतोय?

सीटबेल्ट घातला नसेल तर कारवाईला सामोरे जा…

शरद पवार ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल

 

फडणवीस यांनी सांगितले की, कहर म्हणजे सॅफ्रन. इमॅन्युअल लेनाइन यांचा ट्विट आहे. २ मार्च २०२१चे. तेव्हा ही कंपनी हैदराबादला गेली. तेव्हा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे होते. सॅफ्रन कधी गेलं तर २०२१ला गेलं फॅक्टरी तयार झाली. फॅक्टरीचे उद्घाटन झालं पण फेक नरेटिव्ह तयार होते की, आमच्या सरकारच्या काळात हा प्रकल्प बाहेर गेला. आमचं सरकार गेल्यानंतर १ वर्ष सरकारने त्यांच्याशी संपर्क केला नाही. पत्रही लिहिलं नाही त्यानंतर २०२१ला त्यांनी निर्णय घेतला हैदराबादला जाण्याचा. बातमी दिली जाते सॅफ्रन देखील महाराष्ट्रातून निघून गेले. त्यामुळे फेक नरेटिव्ह करण्याचे हे काम आहे. महाराष्ट्रात येतंय त्याला विरोध, मागच्या सरकारमुळे गेले त्यांचे खापर आमच्या माथी.

मेडिकल डिव्हाइस पार्क, बल्क ड्रग पार्क सरकारला आव्हान आहे. कुठलीही घोषणा केंद्र सरकारने केलेलीच नव्हती.त्यामुळे ते महाराष्ट्रातून जाण्याचा प्रश्नच येत नाही. अडीत वर्षे मोदींना शिव्या देण्याचे काम महाविकास आघाडीने केले. पुन्हा सांगतो महाराष्ट्राला २ वर्षांत नंबर वनवर आणू. गुंतवणुकीत पहिल्या नंबरवर येईल. अडचणी दूर करतो आहोत.

National Stock Exchange
spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

News Danka Samarpan Parv
Star Housing Finance Limited

आम्हाला follow करा

113,459चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
284,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा