32 C
Mumbai
Thursday, April 18, 2024
घरराजकारणमराठा आरक्षणासाठी, आघाडीतील आमदारांनी राजीनामे द्यावेत

मराठा आरक्षणासाठी, आघाडीतील आमदारांनी राजीनामे द्यावेत

Google News Follow

Related

महाविकास आघाडीच्या नाकर्तेपणामुळे मराठा समाज आरक्षणापासून वंचित आहे. आरक्षणाच्या भीतीपोटी राज्य शासनाने लॉकडाऊन १६ जूनपर्यंत वाढवला. महाविकास आघाडीतील आमदारांनी राजीनामे दिले, तर शासनाला आरक्षण देणे भाग पडेल, असं भाजपाचे आमदार नितेश राणे म्हणालेत. तसेच राज्य शासनाने देऊ केलेले ईडब्ल्यूएस प्रवर्गातील आरक्षण केंद्र शासनाचा निर्णय असल्याचे आमदार नितेश राणे यांनी अधोरेखित केले.

आमदार नितेश राणे धुळ्यात पत्रकारांशी बोलत होते. आमदार नितेश राणे यांच्या उपस्थितीत मराठा समाज बांधवांची बैठक झाली, त्यानंतरही आमदार नितेश राणे यांनी भूमिका स्पष्ट केली. या वेळी खासदार डॉ . सुभाष भामरे, आमदार जयकुमार रावल, महापौर चंद्रकांत सोनार आदी उपस्थित होते . आमदार नितेश राणे म्हणाले की, महाविकास आघाडी चुकीची माहिती देऊन मराठा समाजाची फसवणूक करत आहे, महाविकास आघाडीने आरक्षणाच्या प्रश्नाचा खून केल्याचा गंभीर आरोपही त्यांनी केला.

संभाजीराजे छत्रपती आरक्षणासाठी राज्यभर फिरत आहेत. आम्ही त्यांच्या सोबतच आहोत. त्यांच्या भूमिकेपेक्षा वेगळी भूमिका नाही. मी आज धुळ्यात तर संभाजीराजे छत्रपती सिंधुदुर्गात आहेत. एवढा आमच्यातील गोडवा आहे. त्यात कोणी तिसऱ्याने हस्तक्षेप अथवा बोलण्याची गरज नाही, असेही नितेश राणे म्हणाले. महाविकास आघाडी चुकीची माहिती देऊन मराठा समाजाची फसवणूक करत असल्याचंही त्यांनी सांगितलं.

हे ही वाचा:

मेहुल चोक्सीला भारतात आणण्यासाठी ८ सदस्यीय टीम डोमिनिकामध्ये

२०२१ मध्ये भारतात १०१ टक्के पाऊस पडणार

मुंबई महापालिका निवडणूक दोन वर्ष पुढे ढकलण्याचा शिवसेनेचा डाव

ठाकरे सरकारच्या बेपर्वाईने, ओबीसींचा राजकीय हक्क डावलला जाणार

सर्वोच्च न्यायालयात मराठा समाजाच्या आरक्षणाविरोधात याचिका दाखल झाल्यावर महाविकास आघाडी शासन आरक्षणविषयीची भूमिका मांडण्यास कमी पडले. गायकवाड समितीने केलेल्या शिफारशीतील मुद्दे मांडले गेले नाहीत. त्यामुळे मराठा समाजाचे आरक्षण सरसकट नाकारले गेले. आता मुंबईसह इतर जिल्ह्यांमध्ये कोरोनाचे आकडे कमी झाले आहे. परंतु आरक्षण नाकारल्यामुळे महाविकास आघाडीमधील मंत्र्यांना राज्यात फिरता येणार नाही. त्यामुळे राज्यातील लॉकडाऊन १६ जूनपर्यंत वाढविला आहे, असा आरोप आमदार नितेश राणे यांनी केला.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
147,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा