29 C
Mumbai
Friday, February 27, 2026
घरराजकारणसोमय्यांसाठीही महाविकास आघाडी केंद्रावरच अवलंबून!

सोमय्यांसाठीही महाविकास आघाडी केंद्रावरच अवलंबून!

Google News Follow

Related

शिवसेना नेते संजय राऊत यांनी आयएनएस विक्रांतसाठी गोळा केलेल्या मदतनिधीत भारतीय जनता पार्टीचे नेते सोमय्यांनी घोटाळा केल्याचा आरोप केला आहे. दरम्यान, कालपासून सोमय्या यांच्याशी संपर्क होऊ शकत नव्हता. त्यावेळी सोमय्या कुठे गेले? सोमय्या यांना केंद्र सरकारने सुरक्षा दिली असताना सोमय्यांचा शोध कसा लागत नाही, असे सवाल केले जात होते.

त्यादरम्यान, राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी प्रतिक्रिया दिली आहे. ते म्हणाले, सोमय्या यांना सरकारी सुरक्षा असताना ते कुठे आहेत याचे उत्तर सरकारलाच विचारू, असे पाटील म्हणाले आहेत. त्यामुळे सोमय्यांना शोधण्यासाठीही महाविकास आघाडीला केंद्र सरकारवरच अवलंबून राहावं लागत आहे, हे यातून स्पष्ट झाले आहे.

काल किरीट सोमय्या यांचा अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळण्यात आला आहे. राज्य सरकारने न्यायालयात या कथित आरोपात किरीट सोमय्या आणि नील सोमय्या यांना ताब्यात घेऊन चौकशी करण्याची गरज असल्याचे सांगितले आहे. सोमय्यांनी या घोटाळा प्रकरणाचे स्पष्टीकरण दिले आहे. ते म्हणाले, या कथित घोटाळा प्रकरणी मी उच्च न्यायालयात दाद मागणार आहे. फक्त संजय राऊत यांच्या एका विधानावरून तक्रार दाखल करण्यात आली आहे. राऊतांनी याबाबत एकही पुरावा सादर केलेला नाही. संजय राऊत यांनी माझ्यावर खोटे आरोप केले आहेत, असेही सोमय्या यांनी म्हटले आहे.

हे ही वाचा:

पाकिस्तानच्या नव्या पंतप्रधानांना शुभेच्छा देताना पंतप्रधान मोदींनी सुनावले खडे बोल

पहिला ‘लता दीनानाथ मंगेशकर’ पुरस्कार पंतप्रधान नरेंद्र मोदींना!

गाझियाबादमध्ये अग्नितांडव, ४० गायी जिवंत खाक

नीरव मोदीचा सहकारी सुभाष शंकरला इजिप्तमध्ये पकडले

दरम्यान, संजय राऊत यांनी ५८ कोटींचा घोटाळा केल्याचा आरोप सोमय्या यांच्यावर केला आहे. मात्र, किरीट सोमय्या यांनी राज्यपालांना लिहिलेले एक पत्र समोर आले आहे. किरीट सोमय्या यांनी तत्कालीन राज्यपाल शंकर नारायण यांना पत्र लिहिले होते. या पत्रावर किरीट सोमय्या यांची सही असून २०१३ मधील हे पत्र आहे. ‘विक्रांत वाचवा’ मोहिमेसाठी चर्चगेट रेल्वे स्थानकावर ११ हजार २२४ रुपयांचा निधी जमा झाल्याची माहिती सोमय्या यांनी पत्रातून दिली होती.

National Stock Exchange
spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

News Danka Samarpan Parv
Star Housing Finance Limited

आम्हाला follow करा

113,459चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
296,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा