29.4 C
Mumbai
Wednesday, October 21, 2026
घरराजकारण‘मोदींवर टीका करण्याची तुमची लायकी आहे का?’

‘मोदींवर टीका करण्याची तुमची लायकी आहे का?’

Google News Follow

बुलडाणा जिल्ह्यातील चिखली अर्बन बँकेच्या हिरक महोत्सवाच्या निमित्ताने बँकेचे अध्यक्ष सतीश गुप्ता यांनी उद्योजकता प्रोत्साहन आणि प्रशिक्षण शिबीर आयोजित केले होते. यावेळी केंद्रीय मंत्री नारायण राणे हे उपस्थितांना मार्गदशन करत होते. यावेळी राणेंनी नाव न घेता मुख्यमंत्र्यांवर टीका केली. सध्याचे मुख्यमंत्री अज्ञानी आहेत, असेही राणे म्हणाले.

‘साडेतेरा कोटी जनतेला कोणत्याही प्रकारचा दिलासा न देता, केवळ पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर टीका करण्याचे काम महाराष्ट्रातील विद्यमान सरकार करत आहे. मोदींवर टीका करण्याची तुमची लायकी आहे का?’, असा सवाल केंद्रीय सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योगमंत्री नारायण राणे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे नाव न घेता विचारला.

‘महाराष्ट्रात सरकार आहे की नाही, हे कळतच नाही. केवळ त्यांना वाटतं मी पदावर आहे. मात्र अतिवृष्टी आली, वादळ आले, दुष्काळ पडला तर केंद्रानेच द्यावे, अशी राज्य सरकारची अपेक्षा असते. मग तुम्ही तिथे कशाला बसलात?’, असा टोलाही नारायण राणे यांनी लगावला आहे.

हे ही वाचा:

…आता दिल्लीतील महाविद्यालयांना वीर सावरकर आणि सुषमा स्वराज यांचे नाव

१०० कोटी वसुली प्रकरणात संतोष जगताप अटकेत

राष्ट्रीय मागासवर्गीय आयोगाचे उपाध्यक्ष वानखेडे कुटुंबियांच्या भेटीला

आरोग्य विभाग भरती परीक्षेचा गोंधळ सुरूच! पेपर फुटल्याचा आरोप

पंतप्रधानांनी गोरगरीब जनतेसाठी सात वर्षांत अनेक योजना दिल्या. शेतकऱ्यांच्या नावावर अनुदान दिले. आरोप प्रत्यारोपांमध्ये आम्हाला वेळ घालवायचा नाही. समाजातील प्रत्येक नागरिकांचे उत्पन्न कसे वाढेल. त्यांचे जीवनमान कसे उंचावेल, त्यांची प्रगती कशी होईल, शिक्षण, आरोग्य अशा सुविधा सर्वसामान्यांना मिळाल्या पाहिजेत याकडे लक्ष देणे गरजेचे आहे, असेही राणे म्हणाले.

नारायण राणे यांनी काही दिवसांपूर्वी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याविषयी आक्षेपार्ह वक्तव्य केले होते आणि त्यानंतर राणे व ठाकरे यांच्यात टीकेचे युद्ध सुरूच होते.

National Stock Exchange
spot_img

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

113,459चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
339,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा