30 C
Mumbai
Sunday, October 13, 2024
घरधर्म संस्कृतीतुष्टीकरणासाठी काँग्रेस किती खाली जाऊ शकते पाहा!

तुष्टीकरणासाठी काँग्रेस किती खाली जाऊ शकते पाहा!

पोलिस व्हॅनमध्ये बंद केलेल्या मूर्तीबद्दल मोदींनी व्यक्त केली व्यथा

Google News Follow

Related

राज्यासह देशभरात गणेशोत्सवानिमित्ताने जल्लोषाचे वातावरण आहे. मात्र, काही ठिकाणी गणपती उत्सवाला गालबोट लागले. कर्नाटकमध्येही मांड्या जिल्ह्यात प्रथम गणपती मिरवणुकीवर दगडफेकीची दुर्दैवी घटना घडली होती. यानंतर कर्नाटकमध्ये पोलिसांच्या गाडीमध्येचं गणेशाची मूर्ती ठेवल्याचा फोटो व्हायरल झाला असून यावरून आता नव्या वादाला तोंड फुटले आहे. काँग्रेसशासित कर्नाटकात याचे राजकीय पडसाद उमटलेले असतनाचं आता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही या बाबीवरून काँग्रेसवर जोरदार निशाणा साधला आहे.

हरियाणा येथे एका सभेला संबोधित करताना नरेंद्र मोदी यांनी कर्नाटकातील गणेश मूर्तीच्या मुद्द्यावर भाष्य केले. नरेंद्र मोदी म्हणाले की, “काँग्रेस तुष्टीकरणासाठी किती खाली जाऊ शकते. कर्नाटकात काँग्रेस सरकारने गणपतीलाही तुरुंगात टाकले आहे. पोलिसांच्या गाडीत गणपती बाप्पाला बसवले. पूर्ण देश आज गणेशोत्सव साजरा करत आहे आणि काँग्रेस विघ्नहर्ताच्या पूजेतचं विघ्न आणत आहेत. तुष्टीकरणासाठी काँग्रेस काहीही करू शकते,” अशी टीका नरेंद्र मोदींनी केली आहे.

सोशल मीडियावर गणपतीच्या मूर्तीचा एक फोटो व्हायरल होत आहे. या फोटो गणपती बाप्पाची मूर्ती पोलीस व्हॅनमध्ये ठेवल्याचे दिसत आहे. यावरून राजकारण पेटलेलं असून माहितीनुसार, राज्यव्यापी हिंदू संघटना आणि भाजपाने मांड्या येथील गणपती मिरवणुकीवर झालेल्या दगडफेकीच्या घटनेचा निषेध नोंदवण्यासाठी आंदोलन केले होते.

हे ही वाचा:

कर्नाटकात ‘गणपती’ला पोलिस व्हॅनमध्ये कोंडले

घाटकोपरच्या भूतबंगल्याला लागली आग, १२ जण रूग्णालयात दाखल

जम्मू काश्मीरमध्ये तब्बल ३७ वर्षानंतर घरोघरी प्रचार !

जम्मू- काश्मीरच्या किश्तवाडमध्ये दहशतवाद्यांशी झालेल्या चकमकीत दोन जवान हुतात्मा

कर्नाटकमधील मंड्या जिल्ह्यातील नागमंगला येथे बुधवार, ११ सप्टेंबर रोजी रात्री ८ वाजताच्या सुमारास गणेश विसर्जनाची मिरवणूक सुरु होती. यावेळी मिरवणूक नागमंगलाच्या म्हैसूर रोडवरील दर्ग्याजवळून जात असताना दोन गटांमध्ये बाचाबाची झाली. पुढे वाद वाढला आणि जाळपोळ, तोडफोडीच्या घटना घडल्या होत्या. काही समाजकंटकांनी दुकानांची तोडफोड करून वाहनेही पेटवली. यानंतर संपूर्ण परिसरात खळबळ उडाली होती. पोलिसांनी या प्रकरणी ५२ जणांना अटक केली आहे.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
182,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा