27 C
Mumbai
Thursday, January 22, 2026
घरराजकारणविरोधी पक्षांच्या एकजुटीला एनडीए देणार उत्तर

विरोधी पक्षांच्या एकजुटीला एनडीए देणार उत्तर

लवकरच होणार महत्त्वाची बैठक

Google News Follow

Related

लोकसभा निवडणुकीपूर्वी विरोधी पक्षांनी एकजूट दाखवून वातावरण तापवले असताना भाजपही त्यांच्या सहकारी पक्षांना सोबत घेऊन लवकरच राष्ट्रीय लोकशाही आघाडीची एक महत्त्वाची बैठक बोलावण्याची शक्यता आहे. सध्या राष्ट्रीय लोकशाही आघाडीत ३० छोटे-मोठे राजकीय पक्ष आहेत. ज्यांचे सद्यस्थितीत १७ खासदार आहेत. राष्ट्रीय लोकशाही आघाडी आणखी मजबूत करण्यासाठी भाजप आणखी काही घटकपक्षांना सोबत घेण्याच्या विचारात आहे.

संसदेच्या पावसाळी अधिवेशनापूर्वी विरोक्षी पक्ष बेंगळुरू येथे त्यांच्या एकजुटीसंदर्भात महत्त्वाची बैठक घेणार आहे. यात २४ राजकीय पक्ष सहभागी होण्याची शक्यता आहे. याआधी पाटणा येथे झालेल्या बैठकीत १५ राजकीय पक्ष सहभागी झाले होते. या दरम्यान राष्ट्रीय लोकशाही आघाडीही सक्रिय झाली आहे. १९ जुलै रोजी संसदेच्या अधिवेशनापूर्वी रालोआच्या संसदीय नेत्यांची बैठक होणार आहे. परंतु तत्पूर्वी १८ जुलै रोजी रालोआच्या नेत्यांची बैठक बोलावण्याचा विचार सुरू आहे.

हे ही वाचा:

बुडत्या पाकिस्तानला काडीचा आधार; जाहीर झाले बेलआऊट पॅकेज

‘ओएमजी २’चा ‘आदिपुरुष’ होऊ नये म्हणून सेन्सॉर बोर्ड आधीच सज्ज

महिला प्रवाशाने कंडक्टरला काढायला लावली जाळीदार टोपी

नवाब मालिकांना उच्च न्यायालयाचा दणका; जामीन अर्ज फेटाळला

देशाचे राजकारण आता पुढील वर्षी होणाऱ्या लोकसभा निवडणुकीभोवती केंद्रित झाले आहे. संपूर्ण राजकीय वातावरण स्वत:कडे केंद्रित करण्याचा भाजपचा प्रयत्न आहे. विरोधी पक्षांच्या एकजुटीने नुकसान होऊ नये, यासाठी भाजप प्रयत्नशील आहे. त्यामुळे विरोधी पक्षांचे प्रयत्न हाणून पाडण्यासाठी भाजप आताच कामाला लागला आहे. रालोआमध्ये भाजप व्यतिरिक्त सर्वांत जास्त खासदार शिवसेनेच्या शिंदे गटाचे आहेत. शिंदे गटाचे १० खासदार असून अन्य घटक पक्षांकडे १०पेक्षा कमी खासदार आहेत.

रालोआमधील घटकपक्ष

रालोआच्या ज्या घटकपक्षांचे खासदार आहेत, त्यांच्यात भाजप, शिवसेना (शिंदे गट), लोक जनशक्ती पार्टी (पारस गट), अपना दल, एनपीपी, एनडीपीपी, राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट), आजसू, एसकेएम, एमएनएफ, एनपीएफ, एआयडीएमके, आरपीआय (आठवले गट), अगप, पीएमके, टीएमसी (एम) व यूपीपीएल या पक्षांचा समावेश आहे. तर, राओलाच्या अन्य सहकारी पक्षांत बीपीएफ, एमजीपी, जेजेपी, पीजेपी, आरएसपी, जेएसएस, केपीए, यूडीपी, एचएसपीडीपी, निषाद पार्टी, एआयएनआरसी आणि हिंदुस्तानी अवाम मोर्चा यांचाही समावेश आहे.

तर, भाजपची सध्या अन्य काही पक्षांच्या नेत्यांशीदेखील चर्चा सुरू आहे. त्यात चिराग पासवान, ओमप्रकाश राजवर, सुखबीर बादल, जयंत चौधरी, मुकेश साहनी, उपेंद्र कुशवाहा, नागमणी आणि चंद्राबाबू नायडू यांची नावे चर्चेत आहेत. अर्थात या नेत्यांनी किंवा भाजपनेही याबाबत दुजोरा दिलेला नाही.

National Stock Exchange
spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

News Danka Samarpan Parv
Star Housing Finance Limited

आम्हाला follow करा

113,459चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
288,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा