25 C
Mumbai
Sunday, January 25, 2026
घरराजकारणराहुल गांधींच्या काँग्रेसचा इतिहास मतचोरीने भरलेला!

राहुल गांधींच्या काँग्रेसचा इतिहास मतचोरीने भरलेला!

भाजपा खासदार निशिकांत दुबे यांचा प्रहार

Google News Follow

Related

भाजपचे खासदार निशिकांत दुबे यांनी काँग्रेसवर जोरदार प्रहार करताना राहुल गांधी हे वोटचोरीचे आरोप करत आहेत, पण काँग्रेसचा संपूर्ण इतिहासच वोटचोरीने भरलेला आहे, अशी टीका केली. रविवारी आयएएनएसला दिलेल्या मुलाखतीत त्यांनी अनेक प्रश्नांची उत्तरे दिली. यावेळी त्यांनी लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी केलेल्या ‘मतांची चोरी’च्या आरोपावर टीका केली.

राहुल गांधी आधीपासूनच मतचोरीचे आरोप करत आहेत, यावर आपण काय म्हणाल? असे विचारल्यावर दुबे म्हणाले की, मतचोरी म्हणजे काय हे राहुल गांधींनी त्यांच्या कुटुंबाकडून शिकावे. १९८२ मध्ये चौधरी देवीलालांना ९० सदस्यीय विधानसभेत ४५ आमदार मिळाले आणि काँग्रेसला फक्त ३१. तरीही जी.डी. तपासे यांनी भजनलाल यांना मुख्यमंत्रीपदाची शपथ दिली.

याचप्रमाणे आंध्र प्रदेशात एन.टी. रामाराव यांच्या सरकारचा पाडाव झाला. कल्याणसिंग यांना हटवून रमेश भंडारी यांनी कोणाला शपथ दिली? अशा हजारो उदाहरणांचा इतिहास आहे. आणि हेच लोक मतचोरीची भाषा करतात! राहुल गांधींच्या कुटुंबाचा इतिहास मतचोरीने भरलेला आहे, त्यामुळेच ते ओरडत आहेत. बिहारमधील जनता यामुळे कंटाळली आहे. यावेळी काँग्रेसला दोन–तीन जागा मिळाल्या तरी मोठी गोष्ट समजा. १४ नोव्हेंबरनंतर सर्वात मोठी घटना म्हणजे काँग्रेस आणि राजद यांचे नाते कायमचे तुटणार आहे.

प्रियंका गांधी स्टेजवर येऊन महिलांसोबत नृत्य करतात. याचा अर्थ काय? यावर दुबे म्हणाले की, मी त्यांच्या भाषेत उत्तर देणार नाही. नृत्य करणे चुकीचे नाही. प्रियंका गांधी आमच्या सहयोगी खासदार आहेत. त्या चांगले नृत्य करत असतील तर चांगले आहे. पण राहुल गांधी पंतप्रधानांविषयी ज्या प्रकारे बोलतात ते अत्यंत असभ्य आहे. राहुल गांधींचे आई-वडीलही ईशान्य भारतात गेले तेव्हा नाचताना दिसले होते. मग तेव्हाही म्हणावे का की ते मतांसाठी नाचले? त्यांना भारताच्या संस्कृतीची कदर नाही. नरेंद्र मोदी देशाचे पंतप्रधान आहेत, पण राहुल गांधींना पंतप्रधानांबद्दल कसे बोलायचे हे संस्कार दिले गेले नाहीत.

पंतप्रधान नरेंद्र मोदी मतांसाठी तुमच्यासमोर नाचतील अशी टिप्पणी राहुल गांधी यांनी केली होती, त्यावर दुबे यांनी हे उत्तर दिले.

हे ही वाचा:

ॲपलने आपल्या डेव्हलपर वेबसाइटवर सुरू केला नवा विभाग

बिहारमध्ये महिला मोठ्या संख्येने उतरल्या मैदानात

भारत २३ वर्ल्ड-क्लास रिफायनऱ्यांसह आता जगातील टॉप पाच रिफायनिंग देशांमध्ये

गर्भावस्थेत महिलांसाठी वरदान ठरणार हे आसन

राहुल गांधी वारंवार परदेश जातात, यावर दुबेंना विचारल्यावर ते म्हणाले की, राहुल गांधींचे लग्न झालेले नाही म्हणून ते तरुण राहतात असे नाही. माझी वय आणि त्यांचे वय जवळपास सारखेच आहे. माझ्या मुलांपैकी दोघांचे लग्नाचे वय झाले आहे; पुढल्या वर्षी मी एका मुलाचे लग्न लावू शकतो. याचा अर्थ राहुल गांधी आता म्हातारे झाले. राहुल गांधी म्हणतात की त्यांच्या कुटुंबाकडे मालमत्ता नाही, मग ते कोलंबिया, कंबोडिया आणि व्हिएतनामला कसे जातात? इटलीत त्यांच्या कुटुंबाकडे काय आहे? जेन-झेड सगळ्यांची चौकशी करेल आणि त्यांना हाकलून लावेल.

रेवंत रेड्डी म्हणाले की काँग्रेस ही मुसलमानांची पार्टी आहे. यावर दुबे यांनी रेवंत रेड्डी यांना चिमटा काढत म्हटले की, रेवंत आमचे चांगले मित्र आहेत, त्यांनी आमच्यासोबत काम केले आहे. त्यांचा दुःखाचा आवाज बाहेर आला आहे. त्यांना आता समजले आहे की, काँग्रेसला हिंदुत्वाशी काही देणेघेणे नाही; ते फक्त मुसलमानांसाठी बोलतात.

सुप्रिया श्रीनेट पत्रकारांना दलाल व चरणचुंबक म्हणत आहेत. यावर दुबेंना मत विचारल्यावर ते म्हणाले की, सुप्रिया स्वतः पत्रकार राहिल्या आहेत, कदाचित त्या आधी दलालीच करत असतील.

National Stock Exchange
spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

News Danka Samarpan Parv
Star Housing Finance Limited

आम्हाला follow करा

113,459चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
288,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा