22 C
Mumbai
Thursday, January 29, 2026
घरक्राईमनामासंजय राऊत यांनी आपल्या कार्यकर्त्याकडून स्वतःलाच धमकी दिली

संजय राऊत यांनी आपल्या कार्यकर्त्याकडून स्वतःलाच धमकी दिली

भाजपा आमदार नितेश राणेंचा संजय राऊतांवर निशाणा  

Google News Follow

Related

ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत आणि त्यांचे बंधू आमदार सुनील राऊत यांना जीवे मारण्याची धमकी देणाऱ्या मयुर शिंदे याला अटक करण्यात आली आहे. मात्र, हा मयूर शिंदे राऊत बंधूंचा निकटवर्तीय असल्याची माहिती समोर आली आहे. यावरून भाजपा आमदार नितेश राणे यांनी संजय राऊत यांच्यावर निशाणा साधला आहे.

नितेश राणे यांनी थेट राऊत बंधू आणि मयूर शिंदे यांचे एकत्र फोटो दाखवत मयूर शिंदे हा त्यांचा निकटवर्ती असल्याचं म्हटलं आहे. संजय राऊत हे मुळातच ४२० असल्यामुळे सगळ्याच बाबतीत ते एक नंबरचे खोटारडे आहेत. संजय राऊत आणि त्यांचे भाऊ एवढे मोठे भामटे आहेत की, ते स्वतःच्या कार्यकर्त्यांच्या माध्यमातून स्वतःलाचं धमकी देत आहेत. असंच खोटं बोलत ते पोलीस प्रोटेक्शन मध्ये फिरतात. यासाठीच संजय राऊत हे भांडूपचे देवानंद आहेत, अशी खरमरीत टीका नितेश राणेंनी केली आहे.

कार्यकर्त्याला फोन करून स्वतःला धमकी द्यायला लावायची, कॉल रेकॉर्ड करायचा आणि मला धमकी मिळाली माझ्या जीवाला धोका असं म्हणून राज्याच्या गृह्मंत्र्यांवर टीका करायची. संजय राऊत लवकरात पुन्हा तुरुंगात जाणार आणि जनतेला पुन्हा एकदा कैदी नंबर ८९५९ सकाळी चार वाजता बाथरूमसाठी भांडताना दिसणार, अशी टीका नितेश राणेंनी करत संजय राऊत यांना देण्यात आलेली सुरक्षा काढून टाकण्याची मागणी केली.

संजय राऊत यांना धमक्या देणारे हे कार्यकर्ते नेमके कोण आहेत हे खरं कळायला हवं. खरं धमकी मिळाली आहे का याची माहिती घ्यायला हवी. यापुढे संजय राऊतांवर महाराष्ट्राने किती विश्वास ठेवावा याबद्दल खरंच विचार करायला हवा. संजय राऊत हे स्वतःच्या मालकाचे झाले नाहीत ते तुमचे काय होणार हे महाराष्ट्राच्या जनतेने पाहायला हवे.

नुकतंच भांडूप १११ व्या वॉर्डमधील ज्येष्ठ नगरसेविकेने एकनाथ शिंदे यांना पाठींबा दर्शवला असून त्यांनी सुनील राऊत यांच्याकडून मानसिक छळ होत असल्याचे कारण दिले आहे. जिथे राऊत बंधू राहतात अशा भांडुप वार्ड क्रमांक १११ मध्ये त्यांचा पक्ष तिसऱ्या क्रमांकावर आहे. स्वतःच्या भागात शिवसेना वाढू शकत नाही मग, दुसऱ्यांच्या कार्यक्रमात जाऊन दुसऱ्यांच्या जिल्ह्यामध्ये जाऊन भाषण कशाला करावं, असा टोला नितेश राणे यांनी लगावला आहे. कधीही निवडणूक न लढवणारे ठाकरेंचा पक्ष चालवत आहेत, अशी टीका नितेश राणे यांनी केली आहे.

हे ही वाचा:

संजय राऊत धमकीप्रकरणात पाचवी अटक; सुनील राऊत यांच्याशी कनेक्शन असल्यामुळे खळबळ

वरिष्ठांचा त्रास; आत्महत्येआधी दलित युवकाने केली पोस्ट

न्यूझीलंडची अर्थव्यवस्था मंदीत!

सोसायटीच्या आवारात लुंगी आणि गाउन घालून फिरू नका!

संजय राऊतचं उद्धव ठाकरे यांचा बाजार उठवणार आहेत. परदेशी गेलेले उद्धव ठाकरे आणि कुटुंब परत भारतात येणार आहेत का? हा एक प्रश्न आहे. आजच्या सामनामध्ये त्यासंदर्भातचं अग्रलेख आला आहे. श्रीमंत लोक देश सोडून जाणाऱ्या लोकांबद्दल भाष्य करण्यात आलं आहे. त्यामुळे ठाकरेंबद्दल होत असलेल्या चर्चांना प्रकाशझोतात आणण्याचे काम संजय राऊत करत आहे, अशी टीका नितेश राणे यांनी संजय राऊत यांच्यावर केली आहे.

National Stock Exchange
spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

News Danka Samarpan Parv
Star Housing Finance Limited

आम्हाला follow करा

113,459चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
288,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा