31 C
Mumbai
Monday, October 26, 2026
घरराजकारण‘गंदा हे पर धंदा हे ये’

‘गंदा हे पर धंदा हे ये’

Google News Follow

पंतप्रधान नरेंद्र मोदी हे आज विविध विकासकामांचे उद्घाटन करण्यासाठी पुणे दौऱ्यावर होते. दरम्यान शिवसेनेचे मुखपत्र असलेल्या ‘सामना’ या दैनिकाच्या पुणे आवृत्तीच्या पहिल्याच पानावर पुणे मेट्रोच्या उद्घाटनाची संपूर्ण पानभर जाहिरात प्रसिद्ध झाली आहे. या जाहिरातीचीच चर्चा रविवारी सुरू होती. त्यावरून भाजपा नेते आणि आमदार नितेश राणे यांनी संजय राउत यांना खोचक टोला लगावला आहे.

नितेश राणे यांनी ‘सामना’च्या पुणे आवृत्तीच्या पहिल्या पानाचा फोटो शेअर करत ‘सामना’चे कार्यकारी संपादक असलेले संजय राऊत यांना टोला लगावला आहे. ‘गंदा हे पर धंदा हे ये’ असं लिहून नितेश राणे यांनी या जाहिरातीवरून संजय राऊतांना टोला लगावला आहे.

पुण्यात पंतप्रधानांच्या उपस्थितीत या विविध विकासकामांचे उद्घाटन, शुभारंभ रविवार पार पडले. त्यासाठी ही जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली होती. त्याशिवाय, पुण्यातील सिम्बायोसिसमध्येही पंतप्रधान जाणार होते. त्याचीही जाहिरात सामनामध्ये प्रसिद्ध करण्यात आली होती.

हे ही वाचा:

भारताने कसोटी जिंकली; श्रीलंकेवर एक डाव २२२ धावांनी विजय

भारतीय महिलांनी पाकिस्तानला नमवून केली वर्ल्डकपची दमदार सुरुवात

४३४; फिरकीपटू अश्विनकडून कपिल देव यांच्या विक्रमाशी बरोबरी

झेलेन्स्की हिटलिस्टवर

सामनाचे कार्यकारी संपादक संजय राऊत हे महाविकास आघाडीचे सरकार स्थापन झाल्यापासून भाजपा आणि केंद्र सरकारवर सातत्याने आपल्या अग्रलेखांतून टीका करत आले आहेत. पण आज त्याच भाजपाची जाहिरात वर्तमानपत्रात का लावली असा सवाल नेटकरी करत आहेत. शेवटी पैशाचा प्रश्न आला की, विरोध मावळतो अशा प्रतिक्रिया नेटकऱ्यांनी दिल्या. एरवी भाजपा आणि मोदींना तीव्र विरोध करता मग जाहिरात का घेतली असाही सवाल काही नेटकऱ्यांनी विचारला आहे.

National Stock Exchange
spot_img

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

113,459चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
340,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा