25 C
Mumbai
Thursday, December 25, 2025
घरराजकारण‘नितीशकुमार पंतप्रधानपदाचे उमेदवार नाहीत’

‘नितीशकुमार पंतप्रधानपदाचे उमेदवार नाहीत’

संयुक्त जनता दलाची स्पष्टोक्ती

Google News Follow

Related

सन २०२४च्या लोकसभा निवडणुकीत भाजपला नेस्तनाबूत करण्यासाठी विरोधी पक्षांनी एकजुटीचे प्रयत्न सुरू केले आहेत. या पार्श्वभूमीवर २३ जून रोजी विरोधी पक्षांची बैठक होत आहे. मात्र या बैठकीपूर्वीच बिहारच्या सत्ताधारी संयुक्त जनता दलाने नितीशकुमार हे पंतप्रधानपदाचे उमेदवार नसल्याचे स्पष्ट केले आहे. संयुक्त जनता दलाचे प्रमुख प्रमुख राजीव राजन (लालन) सिंह यांनी ‘बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार आगामी लोकसभा निवडणुकीसाठी पंतप्रधानपदाचे उमेदवार नाहीत. पंतप्रधानपदाचा उमेदवार निवडणुकीनंतरच ठरवला जाईल,’ असे स्पष्ट केले आहे.

 

राजीव सिंह यांनी विरोधकांना एकत्र करण्यासंदर्भात सुरू असलेल्या प्रयत्नांदरम्यान पक्षाची भूमिका विस्तृतपणे स्पष्ट केली. ‘नितीश कुमार हे पंतप्रधानपदाचे उमेदवार नाहीत. भाजपमुक्त देशाच्या उभारणीसाठी ते पुढाकार घेत आहेत. ते विरोधी ऐक्य मजबूत करण्यासाठी वचनबद्ध आहेत,’ असे सिंह यांनी सांगितले. तसेच, त्यांनी पक्षाच्या कार्यकर्त्यांना नितीश कुमार यांना पंतप्रधानपदाचे उमेदवार म्हणून समर्थन देणार्‍या घोषणा न देण्याचे आवाहनही केले.

 

‘अशा घोषणांमुळे विरोधी पक्षांच्या ऐक्याला धक्का पोहोचला,’ अशी प्रतिक्रिया सिंह यांनी दिली. ‘निवडणुकीनंतर जेव्हा देश भाजपमुक्त होईल, तेव्हा देशाचे नेतृत्व कोण करेल यावर चर्चा करण्यासाठी सर्व पक्षांची बैठक होईल. जो कोणी देशाचा नेता होईल, ती व्यक्ती देशात लोकशाही पुनर्स्थापित करेल,’ असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

 

सन २०२४च्या लोकसभा निवडणुकीत भाजपला आव्हान देण्याच्या रणनीतीवर चर्चा करण्यासाठी १८ राजकीय पक्ष बैठकीत सहभागी होतील, असा दावा सिंह यांनी केला. जम्मू-काश्मीरचे नॅशनल कॉन्फरन्सचे प्रमुख फारुख अब्दुल्ला आणि काश्मीर पीपल्स डेमोक्रॅटिक पार्टीच्या प्रमुख मेहबुबा मुफ्ती यांनी २३ जून रोजी होणाऱ्या विरोधी पक्षाच्या बैठकीला समर्थन दिले आहे.

हे ही वाचा:

… म्हणून शुभमन गिलला भरावा लागणार दंड!

रॅम्प वॉक करताना लोखंडी खांब कोसळला; २४ वर्षीय मॉडेलचा मृत्यू

फेडरर, नदालला पराभूत करण्यासाठी काय करावे लागेल, याचा सतत विचार केला!

‘आदिपुरुष’ची ऍडव्हान्स बुकिंगमध्ये बाजी, ३६ हजाराहून अधिक तिकिटे विकली गेली

अलीकडे नितीश कुमार यांनी दिल्ली, पश्चिम बंगाल, उत्तर प्रदेश, महाराष्ट्र, ओडिशा आणि कर्नाटकसह अनेक राज्यांमध्ये दौरे करून केंद्रातील सत्ताधारी भाजपच्या विरोधात समविचारी पक्षांना एकत्र आणले आहे. नितीश यांनी पहिल्यांदा १२ एप्रिल रोजी काँग्रेस नेत्यांची भेट घेतली होती. त्यानंतर राहुल गांधी यांनी त्यांच्यासोबतची बैठक म्हणजे विरोधी ऐक्यासाठी एक ‘ऐतिहासिक पाऊल’ असल्याचे वर्णन केले होते. त्यांनी अरविंद केजरीवाल, समाजवादी पक्षाचे प्रमुख अखिलेश यादव, बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी व्यतिरिक्त ओडिशाचे मुख्यमंत्री नवीन पटनायक आणि इतरांचीही भेट घेतली.

 

नितीश यांनी मे महिन्यात झारखंडचे मुख्यमंत्री हेमंत सोरेन, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि शिवसेनेचे (उद्धव ठाकरे गट) प्रमुख उद्धव ठाकरे यांच्याशी संपर्क साधला. बिजू जनता दलाचे प्रमुख नवीन पटनायक यांचीही त्यांनी भेट घेतली. मात्र त्यांनी भाजपविरोधी आघाडीमध्ये सहभागी होण्याबाबत स्पष्ट असे काही सांगितले नाही. आगामी लोकसभा निवडणुकीत ४५० जागांवर भाजपच्या विरोधात एक सामाईक उमेदवार उभे करणे, हे विरोधकांच्या बैठकीचे लक्ष्य असल्याचे सांगितले जात आहे.

National Stock Exchange
spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

News Danka Samarpan Parv
Star Housing Finance Limited

आम्हाला follow करा

113,459चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
285,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा