28.9 C
Mumbai
Wednesday, October 21, 2026
घरक्राईमनामाशंतनू मुळूकला जामीन नाही

शंतनू मुळूकला जामीन नाही

Google News Follow

टूलकिट प्रकरणातील प्रमुख आरोपींपैकी एक असलेल्या शंतनू मुळूक याच्या अटकपूर्व जामीन अर्जावर सुनावणी करताना न्यायालयाने पुढची तारिख दिली आहे. पण तोपर्यंत शंतनू मुळूक याला अटक करण्यात येऊ नये असे निर्देशही न्यायालयाने पोलिसांना दिले आहेत. पटियाला हाऊस येथील अतिरिक्त सत्र न्यायालयाने यासंबंधीचा निकाल दिला आहे. आता या अर्जावर पुढील सुनावणी नऊ मार्च रोजी होणार आहे.

शंतनू मुळूक याच्या जामीन अर्जावर न्यायाधीश धर्मेंद्र राणा यांच्या न्यायालयात सुनावणी सुरु होती. या सुनावणी दरम्यान पोलिसांनी या प्रकरणात तपास करण्यासाठी आणि आपली बाजू मांडण्यासाठी मुदत देण्यात यावी अशी मागणी केली. पोलिसांनी न्यायालयात आपल्या तपासाचा अहवाल सादर केला असून हे प्रकरण गंभीर स्वरूपाचे असल्यामुळे तपासासाठी आणखी थोडा वेळ मिळावा अशी मागणी केली आहे. न्यायालयाने सुनावणी करताना दिल्ली पोलिसांना नऊ मार्च पर्यंतची मुदत दिली आहे पण तोपर्यंत शंतनू याला अटक करण्यात येऊ नये असेही निर्देश दिले आहेत.

हे ही वाचा:

“सिनिअर पीआय दीपक लगड यांना चालवणारा बाप कोण आहे? हे आम्ही शोधून काढू”

ग्रेटा थनबर्ग या कथित पर्यावरणवादी कार्यकर्तीने शेतकरी आंदोलन संबंधी टूलकिट ट्विटरवर अनवधानाने अपलोड करून भारतविरोधी शक्तींचा पर्दाफाश केला. २६ जानेवारीला दिल्ली येथे झालेल्या हिंसाचार आणि टूलकिटच्या संदर्भात दिल्ली पोलिसांनी गुन्हा दाखल केला. दिल्ली पोलिसांच्या तपासात दिशा रवी, निकिता जेकब आणि शंतनू मुळूक या तिघांची नावे समोर आली. दिशा रवी हिला बंगलोर मधून पोलिसांनी अटक केली होती पण तिला दिल्ली न्यायालयाने जामीन मंजूर केला आहे. त्यामुळे आता निकिता आणि शंतनूला न्यायालयाकडून दिलासा मिळतो का हे बघणे महत्वाचे आहे.

National Stock Exchange
spot_img

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

113,459चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
339,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा