आता ठाकरे सरकारने मरण्याची वेळही निश्चित करावी

आता ठाकरे सरकारने मरण्याची वेळही निश्चित करावी

महाराष्ट्रात सध्या कोविडमुळे हाहाकार उडालेला आहे. त्यामुळे सरकारने सध्या संपूर्ण संचारबंदी तर लागू केलीच आहे, परंतु त्याशिवाय सर्व दुकाने सकाळी ११ वाजता बंद करण्याचे आदेश देखील दिले आहे. या निर्णयाची अंमलबजावणी नाशिकमध्ये भलतीच मनावर घेतली गेलेली पहायला मिळाली. जुन्या नाशिक शहरात मर्तिकाचे सामान विकाणारी दुकानेही ११ वाजता बंद केली जात आहेत.

नाशिक शहरात कोरोनाचा कहर खूपच वाढला आहे. त्यामुळे महाराष्ट्रातील इतर शहरांप्रमाणे नाशिकमध्ये देखील सकाळी ११ वाजता सर्व दुकाने बंद केली जात आहेत. प्रशासनाने नियम पाळण्याचा आपला अधिक उत्साह दाखवत मर्तिकाचे सामान विकणारी दुकाने देखील ११ वाजता बंद करायला सुरूवात केली आहे. त्यामुळे आता मरायचं तर ते ही ११ च्या आतच का असा प्रश्न नागरिकांना पडू लागला आहे. प्रशासनाच्या या अजब कारभारावरून भाजपाचे नेते आमदार अतुल भातखळकर यांनी टीका केली आहे.

हे ही वाचा:

इस्राएलनंतर आता अमेरिकाही मास्क मुक्तीकडे?

मुंब्र्यातील रुग्णालयाला आग

आसामला भूकंपाचा धक्का

सेहवाग देतोय कोविड रुग्णांना मोफत जेवण

त्यांनी ट्वीट करताना म्हटले आहे,

बिनडोकपणाचा कहर… लॉक डाउनच्या नियमांची अंमलबजावणी करताना जुन्या नाशिक शहरात मर्तिकाचे सामान विकणारी दुकानेही सकाळी ११ वाजता बंद करण्यात येत आहेत. आता ठाकरे सरकारने मरण्याची वेळही निश्चित करावी जेणे करून अंतिम प्रवासात अडथळे येणार नाहीत.

त्यामुळे आता सरकारच्या नियमांच्या वेळातच लोकांनी प्राण सोडायचे का असा संतप्त सवाल केला जात आहे.

Exit mobile version