‘ऑपरेशन टायगर’ यशस्वी; ओमराजे जाणार शिंदेंसोबत

‘ऑपरेशन टायगर’ यशस्वी; ओमराजे जाणार शिंदेंसोबत

धाराशिवचे खासदार ओमराजे निंबाळकर यांनी अखेर शिवसेनेत जाण्याता निर्णय घेतला आहे. उबाठा शिवसेनेला रामराम ठोकण्याचा निर्णय त्यांनी रविवारी घेतला आहे. सहा खासदार उबाठा शिवसेनेतून एकनाथ शिंदे यांच्यासोबत जाणार असे गेले काही दिवस सांगितले जात होते. त्यातील पाच खासदारांचा निर्णयही निश्चित झाला होता. पण ओमराजेंनी आपल्या कोर्टप्रकरणाच्या निर्णयानंतर आपल्या भवितव्याचा निर्णय घेणार असल्याचे म्हटले होते. त्यासाठी ते आपल्या मतदारसंघात कार्यकर्ते, पदाधिकारी यांच्याशी चर्चा करणार होते.

ओमराजेंचा निर्णय होईपर्यंत ऑपरेशन टायगर यशस्वी झाले की अपयशी याविषयीच्या चर्चा रंगल्या होत्या. पण अखेर ओमराजे यांनी आपल्याला लोकांच्या कामासाठी हा निर्णय घ्यायचा असल्याचे जाहीर केले. त्यामुळे आता सगळे सहा खासदार शिंदे यांच्यासोबत जाणार हे स्पष्ट झाले आहे.

हे ही वाचा:

वाराणशीतील मशिदीबाबत पाकिस्तानला कळवळा, भारताने सुनावले

‘सत्तेशिवाय विकासकामे होत नाहीत’

NEETच्या तणावाची आणखी एक बळी

‘नीट’ परीक्षार्थींसाठी मोदी विमानतळावरच थांबले!

रविवारी त्यांनी या कार्यकर्त्यांशी संवाद साधला. त्यांची मते जाणून घेतली आणि अखेर त्यांनी ही मते जाणून घेतल्यावर कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत त्यांनी आपण शिंदेंसोबत जाणार असल्याची घोषणा केली. आपण सामान्य माणसाची कामे करण्यासाठी शिंदे यांच्यासोबत जाणार असल्याचे त्यांनी जाहीर केले.

माझ्याकडे सामान्य माणसे, शेवटच्या घटकातील माणसं माझ्याकडे आशा लावून आहेत. या सत्तेचा वापर सर्वसामान्यांच्या कामासाठी ताकदीने करत राहीन हे वचन देतोय. मला खात्री आहे की, ज्या पद्धतीने एकनाथ शिंदे यांचा काम करण्याची पद्धत आहेत त्या पद्धतीनेच ते आमच्यासाठीही धावून येतील. त्यांच्या नेतृत्वाखाली चांगल्या पद्धतीने आम्ही काम करू, असे ते म्हणाले.

Exit mobile version