राज्यात उद्यापासून पावसाळी अधिवेशनाला सुरुवात होणार आहे. या पार्श्वभूमीवर आज विरोधकांची पत्रकार परिषद पार पडली, या पत्रकार परिषदेमध्ये बोलताना राज्यात सध्या असलेल्या वेगवेगळ्या प्रश्नांवरून विरोधकांनी सरकारवर जोरदार हल्लाबोल केला. देवेंद्र फडणवीस यांनी विरोधकांच्या प्रश्नांना प्रत्युत्तर दिलं आहे. उद्यापासून तीन आठवडे पावसाळी अधिवेश चालणार आहे, विरोधक चहापानासाठी आले असते तर चर्चा झाली असती. सामान्यांचे प्रश्न कसे सोडवता येतील, यावर अधिवेशनात प्रयत्न केले जातील, असं फडणवीस यांनी म्हटले आहे.
हे ही वाचा:
‘सत्तेशिवाय विकासकामे होत नाहीत’
रोहितबाबतची चर्चा थांबली, इंग्लंडविरुद्धच्या वनडे मालिकेसाठी निवड
होणार तीर्थक्षेत्रांचा कायापालट, मिळणार संस्कृतीला नवी ओळख
जालन्याच्या शाळेतून काफिरांविरुद्धचा शिक्षणप्रसार
ट्रम्प यांचा इराणला इशारा
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी रविवारी इराणला इशारा देत लेबनॉनमधील त्यांच्या सहयोगी संघटना हिजबुल्ला यांना तात्काळ नियंत्रणात ठेवण्यास सांगितले. अन्यथा इराणविरुद्ध पुन्हा लष्करी कारवाई करण्याची धमकी त्यांनी दिली. अमेरिका आणि इराण यांच्यातील तणाव कमी करण्यासाठी स्वित्झर्लंडमध्ये सुरू असलेल्या चर्चेदरम्यान ट्रम्प यांनी हा इशारा दिला. ट्रुथ सोशल वर ट्रम्प यांनी लिहिले, “इराणने लेबनॉनमधील आपल्या मोठ्या प्रमाणात आर्थिक मदत मिळणाऱ्या प्रतिनिधी गटांना (प्रॉक्सी) तात्काळ गोंधळ घालणे थांबवण्यास सांगावे. अन्यथा, आम्ही इराणवर पुन्हा खूप कठोर हल्ला करू.
कारने स्कूटरस्वाराला उंच हवेत उडवले
राजकोट येथे रविवारी सकाळी एक गंभीर अपघात झाला. १७ वर्षांच्या अल्पवयीन मुलाने वेगाने कार चालवत असताना एका स्कूटरला धडक दिली. या अपघातात ४४ वर्षीय स्कूटरस्वार गंभीर जखमी झाला. स्कूटरस्वार या धडकेमुळे काही मीटर उंच उडाला आणि खाली आदळला. सध्या हा अपघातग्रस्त व्यक्ती गंभीर जखमी असून त्याच्यावर उपचार सुरू आहेत. सीसीटीव्हीत हा अपघात दिसत आहे. पोलीसांच्या माहितीनुसार, पाच अल्पवयीन मुले कारमधून योगा सत्रासाठी गेली होती. योगा सत्रावरून परत येताना १७ वर्षीय मुलगा कार चालवत होता.







