30.5 C
Mumbai
Sunday, June 21, 2026
घरस्पोर्ट्सरोहितबाबतची चर्चा थांबली, इंग्लंडविरुद्धच्या वनडे मालिकेसाठी निवड

रोहितबाबतची चर्चा थांबली, इंग्लंडविरुद्धच्या वनडे मालिकेसाठी निवड

बुमराह परतला, विराटच्या फिटनेसची चिंता

Google News Follow

Related

भारताच्या भविष्यातील वनडे योजनांमध्ये रोहित शर्माचे स्थान काय असेल याबाबत सुरू असलेल्या चर्चांदरम्यान बीसीसीआयने सध्या तरी सर्व अटकळींना पूर्णविराम दिला आहे. अनुभवी फलंदाज आणि टी-20 विश्वचषक विजेता कर्णधार रोहित शर्माचा पुढील महिन्यापासून सुरू होणाऱ्या इंग्लंडविरुद्धच्या वनडे मालिकेसाठी भारतीय संघात समावेश करण्यात आला आहे. दुसऱ्या सलामीवीराच्या भूमिकेसाठी प्रबळ दावेदार असलेल्या यशस्वी जैस्वालला मात्र आणखी प्रतीक्षा करावी लागणार आहे.

जैस्वालने शनिवारी अफगाणिस्तानविरुद्धच्या तिसऱ्या वनडेमध्ये नाबाद ११० धावांची खेळी केली होती. तरीही त्याला वनडे संघातून वगळण्यात आले आहे. त्याने मागील तीन वनडे सामन्यांपैकी दोनमध्ये शतके झळकावली असली तरी त्याला अद्याप संघात सातत्याने संधी मिळालेली नाही.

बीसीसीआयच्या एका सूत्राने पीटीआयला सांगितले, “इंग्लंडविरुद्धच्या मालिकेत वरच्या फलंदाजी क्रमात फारसे प्रयोग होणार नाहीत. विराट कोहली तिसऱ्या क्रमांकावर परतणार असून शुभम गिल रोहित शर्मासोबत सलामीला उतरेल. राखीव सलामीवीर म्हणून इशान किशन उपलब्ध आहे.”

विराट कोहलीची निवड, पण एका अटीवर

विराट कोहलीची संघात निवड करण्यात आली आहे, मात्र त्याला फिटनेस चाचणी उत्तीर्ण करावी लागेल. हॅमस्ट्रिंग दुखापतीमुळे तो अफगाणिस्तानविरुद्धची मालिका खेळू शकला नव्हता. तो या आठवड्यात फिटनेस चाचणी देणार आहे. चाचणीत यशस्वी झाल्यास त्याचा अंतिम संघात समावेश होईल.

जसप्रीत बुमराहचे पुनरागमन

वेगवान गोलंदाज जसप्रित बुमराह याचेही संघात पुनरागमन झाले आहे. तसेच अनुभवी अष्टपैलू अक्षर पटेल यालाही संघात स्थान मिळाले आहे. त्याने युवा फिरकीपटू हर्ष दुबे याची जागा घेतली आहे. सूत्रांच्या मते, आगामी विश्वचषकाच्या दृष्टीने अक्षर पटेल आणि हर्ष दुबे या दोघांनाही वेळोवेळी संधी दिली जाईल. सध्या रवींद्र जाडेजा याला मुख्यतः कसोटी विशेषज्ञ म्हणून पाहिले जात आहे.

हे ही वाचा:

‘नीट’ परीक्षार्थींसाठी मोदी विमानतळावरच थांबले!

तामिळनाडूत अमोनिया गॅस गळतीने ७ जण दगावले

हॉर्मुझमधून भारतीय तेलवाहू जहाजांची सुरक्षित सुटका

पंढरीच्या वाटेवर धावणार ५,५०० विशेष बसेस

इंग्लंडविरुद्ध वनडे मालिका

  • १४ जुलै – एजबॅस्टन
  • १६ जुलै – सोफिया गार्डन्स
  • १९ जुलै – लॉर्ड्स

भारताचा वनडे संघ

शुभमन गिल (कर्णधार), रोहित शर्मा, विराट कोहली (फिटनेस मंजुरीच्या अधीन), श्रेयस अय्यर (उपकर्णधार), केएल राहुल (यष्टीरक्षक), ईशान किशन (यष्टीरक्षक), वॉशिंग्टन सुंदर, अक्षर पटेल, नितीश कुमार रेड्डी, कुलदीप यादव, जसप्रीत बुमराह, प्रसिद्ध कृष्णा, हर्षित राणा, अर्शदीप सिंग, गुरनूर ब्रार.

आयर्लंडविरुद्ध टी-20 संघ

वरुण चक्रवर्ती पायाच्या दुखापतीमुळे आयर्लंडविरुद्धच्या टी-20 मालिकेत खेळू शकणार नाही.

भारताचा टी-20 संघ:

श्रेयस अय्यर (कर्णधार), अभिषेक शर्मा, संजू सॅमसन, ईशान किशन, शिवम दुबे, तिलक वर्मा (उपकर्णधार), नितीश कुमार रेड्डी, अक्षर पटेल, वॉशिंग्टन सुंदर, रवी बिश्नोई, हर्षित राणा, अर्शदीप सिंग, प्रिन्स यादव, वैभव सूर्यवंशी, प्रसिद्ध कृष्णा.

National Stock Exchange
spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

News Danka Samarpan Parv
Star Housing Finance Limited

आम्हाला follow करा

113,459चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
316,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा