30.4 C
Mumbai
Monday, June 22, 2026
घरधर्म संस्कृतीहोणार तीर्थक्षेत्रांचा कायापालट, मिळणार संस्कृतीला नवी ओळख

होणार तीर्थक्षेत्रांचा कायापालट, मिळणार संस्कृतीला नवी ओळख

Google News Follow

Related

राज्य व केंद्र सरकारने महाराष्ट्रातील प्रमुख तीर्थक्षेत्रांचा कायापालट करण्यासाठी पाच हजार कोटींची ‘हेरिटेज संवर्धन व तीर्थक्षेत्र विकास योजना’ लागू केली आहे. याद्वारे मंदिरांना त्यांचे मूळ ऐतिहासिक व हेमाडपंती स्वरूप मिळवून दिले जात आहे.बारा ज्योतिर्लिंगांपैकी एक असलेल्या भीमाशंकर मंदिराचे २८८.१७ रुपये कोटी खर्चून नूतनीकरण करण्यात आले आहे. नुकतेच एक जून २०२६ पासून ते भाविकांसाठी पुन्हा खुले झाले आहे. अक्कलकोट येथे एक दिवशी एक लाख भाविकांना भोजन प्रसाद देण्याची क्षमता असलेले अत्याधुनिक व स्वयंचलित ‘महाप्रसाद गृह’ उभारले जात आहे. त्याचप्रमाणे तुळजापूर, कोल्हापूरसह सात प्रमुख धार्मिक स्थळांचा महाकॉरिडॉर आणि राज्यातील पाच ज्योतिर्लिंगांना जोडणारा ‘ज्योतिर्लिंग कॉरिडॉर’ विकसित होत आहे. तसेच, सन २०२७ च्या नाशिक सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी ‘नमामि गोदा’ व अत्याधुनिक ‘साधू ग्राम’ यांद्वारे पायाभूत सुविधांचे नियोजन सुरू आहे.

पोहरादेवी (७०० कोटी रुपये), जेजुरी (३४९.४५ कोटी रुपये) आणि दीक्षाभूमी (२०० कोटी रुपये) यांसारख्या विविध समाज-घटकांशी संबंधित श्रद्धास्थानांच्या विकासासाठी भरीव निधी देण्यात आला आहे. ‘राष्ट्रीय शैक्षणिक धोरण २०२०’ अंतर्गत वेद पाठशाळांना आधुनिक विज्ञानाची जोड देऊन तेथील पदव्यांना १०वी-१२वीची समकक्षता देण्यात आली आहे.

राज्यातील प्रमुख तीर्थक्षेत्रांचा कायापालट करण्यासाठी आणि त्यांना मूळ सांस्कृतिक स्वरूपामध्ये आणण्यासाठी राज्य व केंद्र सरकारने ‘तीर्थक्षेत्र विकास योजनां’च्या माध्यमातून मोठ्या प्रमाणावर गुंतवणूक सुरू केली आहे. भीमाशंकर मंदिराचे पुनरुत्थान, अक्कलकोट येथील महाप्रसाद इमारत, नाशिक सिंहस्थ कुंभमेळा २०२७ ची पूर्वतयारी आणि शैव क्षेत्रांचा विकास या सर्व बाबी केवळ धार्मिक आस्थेशी जोडलेल्या नसून, त्या महाराष्ट्राच्या ‘धार्मिक पर्यटनाचे अर्थकारण’ बदलून टाकणाऱ्या ठरत आहेत. शनिवारीच केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत कोल्हापूर येथील महालक्ष्मी मंदिर आणि परिसराचे रूप पालटून टाकण्याच्या कामाचा शुभारंभ झाला आहे. हा महत्त्वाकांक्षी प्रकल्प पुरा झाल्यानंतर कोल्हापूरच्या मंदिर परिसराला आणि देवस्थान म्हणून कोल्हापूरला एक नवीन ओळख मिळेल.
हे ही वाचा:
जालन्याच्या शाळेतून काफिरांविरुद्धचा शिक्षणप्रसार
अभूतपूर्व सुरक्षा व्यवस्थेत ‘नीट’ परीक्षा
चिलीवर गोलांचा वर्षाव; भारतीय महिला हॉकी संघ अंतिम फेरीत
भविष्यवाणीही खरी, मोरोक्कोचाही विजय; नोरा फतेहीचा जल्लोष
भीमाशंकर मंदिर भाविकांना खुलेबारा ज्योतिर्लिंगांपैकी एक आणि महाराष्ट्राचे वैभव असलेले श्रीक्षेत्र भीमाशंकर मंदिर हे लाखो शिवभक्तांचे श्रद्धास्थान आहे. सिंहस्थ कुंभमेळा आणि वाढत्या भाविकांच्या संख्येचा विचार करून प्रशासनाने ९ जानेवारी २०२६ पासून भीमाशंकर मंदिर परिसर विकासकामांसाठी भाविकांना तात्पुरता बंद ठेवला होता. मंदिराच्या मूळ रचनेला धक्का न लावता सभामंडपाचे नूतनीकरण, मुख्य घुमटाची दुरुस्ती, आणि पायऱ्यांच्या मार्गाचे बळकटीकरण करण्यात आले. अखेर १ जून २०२६ रोजी हे मंदिर पूर्ण वैभवासह पुन्हा भाविकांसाठी खुले झाले.

मंदिर परिसरातील १५० स्थानिक कुटुंबांचे या हेरिटेज वाडीत पुनर्वसन केले जात आहे, जिथे त्यांना आधुनिक सुविधांनी युक्त घरे आणि व्यापारासाठी सुसज्ज दुकाने दिली जातील. ज्येष्ठ नागरिकांसाठी आणि दिव्यांगांसाठी संपूर्ण परिसरात इलेक्ट्रिक वाहनांची (ई-व्हीकल्स) व्यवस्था केली जात आहे.

अक्कलकोट : महाक्षमतेचे महाप्रसाद केंद्र

स्वामी समर्थ महाराजांची कर्मभूमी असलेले सोलापूर जिल्ह्यातील अक्कलकोट हे केवळ महाराष्ट्रातीलच नव्हे, तर देशातील कोट्यवधी भाविकांचे श्रद्धास्थान आहे. अक्कलकोट वटवृक्ष स्वामी समर्थ महाराज देवस्थान आणि मुख्य मंदिर प्रशासनाच्या वतीने भाविकांच्या अन्नदानाचा संकल्प पूर्ण करण्यासाठी अवाढव्य ‘महाप्रसाद गृहाचे’ बांधकाम पूर्णत्वाकडे जात आहे. हे केंद्र आधुनिक अन्नछत्र प्रणालीचे जागतिक मॉडेल म्हणून उदयास येत आहे. या नूतन इमारतीत एक लाख भाविक महाप्रसादाचा लाभ घेऊ शकतील.

मंदिरे मूळ ऐतिहासिक स्वरूपात

महाराष्ट्र सरकारने सांस्कृतिक वारसा जतन करण्यासाठी पाच हजार कोटी रुपयांची भव्य ‘हेरिटेज संवर्धन आणि तीर्थक्षेत्र विकास योजना’ लागू केली आहे. सांस्कृतिक कार्य खात्याच्या या योजनेचा मुख्य उद्देश मंदिरांना त्यांचे मूळ ऐतिहासिक स्वरूप मिळवून देणे हा आहे.

बऱ्याच वर्षांपासून अनेक प्राचीन मंदिरांवर सिमेंटचे गिलावे, चुकीचे रंगकाम किंवा अनधिकृत बांधकामे झाली होती. या योजनेतून मंदिरांचे मूळ स्वरूप पूर्ववत केले जात आहे. आधुनिक सिमेंट आणि रसायने हटवून पुरातन दगडी बांधकाम, हेमाडपंती शैली आणि कोरीव काम उजेडात आणले जात आहे. महाराष्ट्रात जवळपास १,८०० जुन्या बारवा (विहिरी) आहेत. त्यांचा गाळ काढून, त्यांची डागडुजी करून त्या केवळ पाण्याचे स्रोत म्हणून नव्हे, तर पर्यटन स्थळ म्हणून विकसित होत आहेत. राज्यातील ६० राज्य संरक्षित किल्ले आणि ३५० अप्रसिद्ध किल्ल्यांच्या तटबंदीची दुरुस्ती केली जात आहे.

 

प्रमुख ७ धार्मिक स्थळांचा महाकॉरिडॉर

या योजनेत सात प्रमुख शक्तिपीठे आणि मंदिरांचा कायापालट केला जात आहे:

तीर्थक्षेत्राचे नाव जिल्हा महत्त्वाचे वैशिष्ट्य / विकास
श्री तुळजाभवानी मंदिर धाराशिव साडेतीन शक्तीपीठांपैकी एक, भाविकांसाठी भव्य कॉरिडॉर व दर्शन रांग व्यवस्थापन
महालक्ष्मी मंदिर कोल्हापूर ऐतिहासिक दगडी मंदिराचे संवर्धन आणि परिसराचे सुशोभन
रेणुका माता मंदिर नांदेड (माहूर) गडावर जाण्यासाठी सुसज्ज रस्ते आणि भक्तनिवास
त्र्यंबकेश्वर ज्योतिर्लिंग नाशिक कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर परिसराचे पुनरुज्जीवन
श्री ज्योतिबा देवस्थान कोल्हापूर डोंगरावर अनेक सुविधांचा विकास
संत तुकाराम जन्मस्थान पुणे (देहू) ४१ कोटी रुपयांचा आराखडा. लवकरच काम वेग घेणार.

 

शैव क्षेत्र आणि ज्योतिर्लिंगांचे जाळे

महाराष्ट्रात पाच ज्योतिर्लिंगे आहेत. केंद्र सरकारच्या ‘प्रसाद’ (PRASHAD) योजनेच्या आणि राज्याच्या निधीच्या समन्वयाने या पाचही ज्योतिर्लिंगांना जोडणारा ‘ज्योतिर्लिंग कॉरिडॉर’ विकसित होत आहे…

परळी वैजनाथ (बीड) : मंदिराच्या परिसराचा विस्तार करून आतले रस्ते रुंद केले जात आहेत.

औंढा नागनाथ (हिंगोली) : हे मंदिर महाभारतकालीन मानले जाते. येथील दगडी कोरीव कामाचे आणि मंदिराच्या पायाचे भूगर्भीय संवर्धन केले जात आहे.

घृष्णेश्वर (छत्रपती संभाजीनगर) : वेरूळ लेण्यांच्या जवळच्या या मंदिराच्या परिसरात पार्किंग, भक्तनिवास आणि गार्डन कॉरिडॉरचे काम सुरू आहे.

भीमाशंकर आणि त्र्यंबकेश्वर : हे दोन प्रमुख केंद्रबिंदू ठरले आहेत, कारण यांचा थेट संबंध निसर्ग संवर्धन आणि कुंभमेळ्याशी येतो.

नाशिक सिंहस्थ कुंभमेळा २०२७

सन २०२७ मध्ये म्हणजे पुढच्याच वर्षी होणाऱ्या नाशिक-त्र्यंबकेश्वर सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी महाराष्ट्र प्रशासनाने आत्तापासूनच आपली ९० टक्क्यांपेक्षा जास्त कामे पूर्ण करण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे.

कुंभमेळ्याचे नियोजन आणि पायाभूत सुविधा

‘नमामि गोदा’ प्रकल्पात गोदावरी आणि रामकुंड परिसराचे पाणी शुद्ध ठेवण्यासाठी विशेष सांडपाणी प्रक्रिया प्रकल्प होत आहेत. नदीच्या घाटांचे रुंदीकरण आणि डागडुजी केली जात आहे. देशभरातून येणाऱ्या १० शैव आणि वैष्णव अखाड्यांच्या साधूंसाठी नाशिक आणि त्र्यंबकेश्वर येथे शेकडो एकर जागेवर अत्याधुनिक ‘साधू ग्राम’ वसवले जात आहे, जिथे वीज, पाणी आणि आरोग्याची २४ तास मोफत सुविधा असेल.

गर्दी नियंत्रणासाठी एआय कॅमेरे, ड्रोन मॉनिटरिंग आणि भाविकांसाठी विशेष मोबाईल ॲप्स विकसित होत आहेत. ज्याच्या माध्यमातून दर्शनाची वेळ आणि पार्किंगची जागा आधी आरक्षित करता येईल.

महाराष्ट्रातील मंदिरांचा विकास

महाराष्ट्राच्या सामाजिक आणि सांस्कृतिक संरचनेत बहुजन, दलित, आदिवासी आणि विमुक्त जातींच्या संतांचे आणि श्रद्धास्थानांचे मोठे योगदान आहे. त्यामुळेच, राज्य सरकारने ‘सामाजिक न्याय व विशेष साह्य विभाग’ आणि इतर खात्यांच्या माध्यमातून मागासवर्गीय, बहुजन आणि वंचित घटकांशी संबंधित अशा अनेक देवस्थानांसाठी अनेक कोटींचा निधी दिला आहे.

समाजातील विविध घटकांच्या देवस्थानांसाठी…

पोहरादेवी विकास आराखडा (वाशीम – बंजारा समाज) : बंजारा समाजाची काशी मानल्या जाणाऱ्या पोहरादेवी आणि उमरी गडाच्या विकासासाठी ₹७०० कोटींपेक्षा जास्त निधी मंजूर झाला आहे.

जेजुरी गड विकास आराखडा (पुणे – धनगर व बहुजन समाज): मार्तंड देवस्थान जेजुरीच्या ऐतिहासिक संवर्धनासाठी ₹३४९.४५ कोटींचा भव्य आराखडा मंजूर असून कामे अंतिम टप्प्यात आहेत.

भगवानगड (अहमदनगर/बीड – वंजारी समाज) : संत भगवानबाबा यांच्या तपोभूमीच्या विकासासाठी आणि भाविक सुविधांसाठी ₹५० कोटींची विशेष तरतूद करण्यात आली आहे. २. अनुसूचित जाती आणि नवबौद्ध घटक :

चोखामेळा महाराज तीर्थक्षेत्र विकास (मंगळवेढा) : दलित संत शिरोमणी चोखामेळा यांच्या स्मृती प्रीत्यर्थ मंगळवेढा येथील स्मारकासाठी आणि मंदिरासाठी ₹५० कोटींपेक्षा जास्त निधी वितरित झाला आहे.

दीक्षाभूमी (नागपूर) आणि चैत्यभूमी (मुंबई) : बौद्ध समाजाची ही प्रमुख श्रद्धास्थाने असून दीक्षाभूमीच्या जागतिक दर्जाच्या विस्तारासाठी शासनाने ₹२०० कोटींपेक्षा अधिक निधी मंजूर करून कामे सुरू केली आहेत.

समाजमंदिरे व सांस्कृतिक केंद्र : ग्रामीण भागातील अनुसूचित जाती वस्त्यांमध्ये स्थानिक समाजमंदिरे आणि सांस्कृतिक केंद्रांच्या बांधकामासाठी व दुरुस्तीसाठी लोकसंख्येच्या निकषानुसार ₹४ लाख ते ₹४० लाखांपर्यंतचे थेट अनुदान दिले जाते.

 

वेद पाठशाळा आणि ‘महर्षी सांदीपनी राष्ट्रीय वेद विद्या प्रतिष्ठान’ (MSRVVP)

उज्जैन येथील केंद्रीय शिक्षण मंत्रालयाच्या अंतर्गत येणाऱ्या ‘महर्षी सांदीपनी राष्ट्रीय वेद विद्या प्रतिष्ठान’ द्वारे देशभरातील ४५० पेक्षा जास्त वेद पाठशाळा आणि ‘गुरू-शिष्य परंपरा’ केंद्रांना थेट अनुदान दिले जाते. पाच राज्यांमध्ये नवीन राष्ट्रीय आदर्श वेद विद्यालये सुरू झाली आहेत. शिक्षण खात्याने या उपक्रमांसाठी ₹५० कोटींपेक्षा जास्त वार्षिक आर्थिक साह्य दिले आहे. यातून शिक्षकांचे मानधन आणि विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती दिली जाते.

National Stock Exchange
spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

News Danka Samarpan Parv
Star Housing Finance Limited

आम्हाला follow करा

113,459चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
316,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा